‘व्हॅलेंटाईन डे’ला उर्वशीनं केला I Love You बोलण्याचा ‘हट्ट’, ट्रोलर्स म्हणाले… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेला नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिचे मंजुलिकाच्या लुकमध्ये काही फोटो व्हायरल झाले होते. यानंतर आता उर्वशीचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत उर्वशी कोणाला तरी आय लव्ह यु बोलण्यासाठी डिमांड करताना दिसत आहे.

खरं तर उर्वशीनं दिल्लीच्या मुलींची मिमिक्री केली आहे. व्हिडीओ शेअर करताना उर्वशी कॅप्शनमध्ये म्हणते, “या वॅलेंटाईन वीकमध्ये दिल्लीच्या मुली काही अशा असतील. आप बोलो आय लव्ह यु. बस एक बार बोल दो.” असं ती म्हणाली आहे. व्हिडीओत उर्वशी वारंवार आय लव्ह यु बोलण्यासाठी म्हणताना दिसत आहे. व्हिडीओत उर्वशी किस करतानाही दिसत आहे. उर्वशीचा हा फनी व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

उर्वशीच्या या व्हिडीओला आतापर्यंत 12 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. उर्वशीच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट केली आहे. परंतु काहींनी मात्र उर्वशीला ट्रोलही केलं आहे. काहींनी तिची तुलाना राखी सावंत सोबत केली आहे. तर काहींनी तिला नशा करण्यासाठी कमेंट केली आहे.

एकानं म्हटलं आह की, काय फुकलं आहेस ताई. एकानं म्हटलं की, असं वाटतंय की बॉलिवूडला दुसरी राखी सावंत मिळाली आहे. एकानं म्हटलं की, सुकेलला गांजा. एकानं कमेंट केली स्वस्त गांजा. एकानं म्हटलं की, ओव्हर ॲक्टींगचे 50 रुपये कट करू का. काहींनी म्हटलं, आणखी एक राखी सावंत आम्ही सहन करू शकत नाही. एकानं तिला ती राखी सावंतच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती मल्टीस्टारर पागलपंती सिनेमात दिसली होती. 22 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा खास काही चालला नाही.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like