…म्हणून अभिनेत्री उर्वशी रौतेला ‘भडकली’ तिच्या X ‘पीआर’ वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची खूपच सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या एक्स पीआर मॅनेजरला तिची बदनामी केल्यामुळे चांगलेच खडसावले आहे. उर्वशीने आपल्या पर्सनल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मेसेज शेअर केला आहे. उर्वशीने लिहले की, ‘ही किती आपत्तीजनक गोष्ट आहे की, लोक कोणत्याही गोष्टींना खरे मानू लागतात. ५ वर्षापुर्वी माझा एक पीआर होता. तो मला ब्लॅकमेल करण्याच्या आरोपावरुन जेलमध्ये देखील गेला होता. त्याने सांगितलेल्या गोष्टींना मिडियाने खरे समजले. ही खूप वाईट बातमी आहे की, लोक आपले काम सोडल्यानंतरही आपली बदनामी करण्यासाठी आपल्या मागे असतात.’

उर्वशीने पुढे लिहले की, ‘तिला आज जो आदर मिळतो त्यासाठी तिने खूप मेहनत केली आहे.’ उर्वशीने काही दिवसांपुर्वी विराट कोहलीच्या स्टॅच्यूसोबत फोटो काढून सोशल मिडियावर शेअर केला होता. त्या फोटोंमुळे देखील ती वादामध्ये सापडली होती. त्या फोटोमध्ये उर्वशीने विराट कोहलीच्या स्टॅच्यूला हग केले होते. उर्वशी लवकरच चित्रपट ‘पागलपंती’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे निर्देशन अनीज बज्मी हे करत आहे.

या चित्रपटात उर्वशी व्यतिरिक्त जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूज, अरशद वारसी, पुलकित सम्राट आणि कृति खरबंदा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ८ नोहेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला भूषण कुमार प्रोड्यूस करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

प्रदूषणापासून करा ” केसांचा ” बचाव

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी “

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे

तोंडाला चव येण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मानसिक आजारांवर वेळीच उपचार करणे गरजेचे

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण

सिने जगत

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘सेक्सोलॉजिस्ट’च्या भूमिकेत ; ‘खानदानी शफाखाना’च पहिलं ‘पोस्टर’ रिलीज

सुट्टीवर ग्रीसला गेलेल्या ‘नागिन’ फेम करिश्मा तन्नाचे ‘ते’ शॉर्ट ड्रेसमधील फोटो ‘व्हायरल’

Loading...
You might also like