अभिनेत्री उर्वशी रौतेलानं हार्दिक पंड्याला दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेला चर्चेत आहे. नुकतीच ती बोनी कपूर सोबतच्या संभाषणादरम्यानच्या एका व्हिडीओमुळे ट्रोल झाली होती. हे शांत झाले नाही तेच तिच्या आणि हार्दिक पंड्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. या सगळ्यावर आता उर्वशीनं मौन सोडलं आहे. चुकीच्या पद्धतीनं तिचा व्हिडीओ व्हायरल करत निर्माते बोनी कपूर यांच्यावर चुकीचे आरोप झाले होते.

उर्वशीला बोनी यांनी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा आरोप झाला होता. मीडियाला दोघं एकत्र पोज देताना त्यांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. यावर उर्वशीनं मौन बाळगल्यानं ती ट्रोल झाली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिनं यावर भाष्य केलं आहे.

‘…म्हणून मला वाईट वाटलं’
उर्वशी म्हणाली, “बोनी कपूर अजिबात वाईट नाहीत. त्यांनी मला चुकीच्या पद्धतीनं अजिबात स्पर्श केला नाही. ते खूप चांगले आहेत. आमची फिल्मला घेऊन तेव्हा चर्चा सुरू होती. मी त्यांच्यासोबत एक सिनेमा करणार होते. बोनीजीचं नाव चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केल्यानं मला वाईट वाटलं.”

‘हार्दिकनं त्याच्या क्रिकेटवर फोकस केलेलंच चांगलं असेल’
हार्दिक पंड्यासोबच्या अफेअरच्या प्रश्नावर उर्वशी हार्दिकला सल्ला देत म्हणाली की, तिचं हार्दिक सोबत कोणतंही अफेअर नाही. ती केवळ तिच्या कामावर फोकस करत आहे. हार्दिकनं त्याच्या क्रिकेटवर फोकस केलेलंच चांगलं असेल. सध्या ती कोणत्याही नात्यात नसून सिंगल असल्याचंही तिनं सांगितलं.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती पागलपंती सिनेमात झळकली. या सिनेमात तिच्यासोबत अर्शद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, कृती खरबंदा हे कलाकार दिसले. जॉन अब्राहम आणि इलयाना डिक्रूज स्टारर पागलपंती हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 रिलीज झाला. सिंह साहब द ग्रेट या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ती हनी सिंगच्या लव डोस या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे.

View this post on Instagram

🚿 #MAXIM

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on

View this post on Instagram

i’m feeling shy #tanned

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on

 

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like