‘हॉट’ अभिनेत्री उर्वशी रौतेलाने चोरले PM मोंदींचे ट्विट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला ही वेगवेगळ्या कारणामुळे कायम चर्चेत राहत आली आहे. आता मात्र ती एका चोरीच्या कारणावरुन चर्चेत आली आहे. होय तिने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटची चोरी केल्याचे उघड झाल्याने तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघातात जखमी झाल्या. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी बॉलिवुडमधील अनेक तारेतारकांनी प्रार्थना केली. तशी अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही आपल्या अकाऊंटवर ट्विट करुन प्रार्थना केली. पण तेथेच ती फसली व तिच्या फॅन्सनी तिची चोरी पकडली.

शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात अस्वस्थ करणारा आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असे ट्विट तिने केले. पण नवल म्हणजे तिचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदर केलेले ट्विट यातील सर्व शब्द सारखे आहेत. त्यावरुन नेटकऱ्यांनी मोदींच्या ट्विटची कॉपी करुन ती पोस्ट केल्याचा आरोप केला आहे. अनेकदा जादा प्रसिद्धी जशी चांगली असते. तशीच तुम्ही काय करता, याकडे सर्वांचे अतिशय बारीक लक्ष असते, यावरुन स्पष्ट झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –