उर्वशी रौतेलाला आवडली ‘आसिम-जॅकलीन’ची ‘केमिस्ट्री’, म्हणाली- ‘क्युट कपल’

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस स्पर्धक आसिम रियाज आणि बॉलिवूड स्टार जॅकलीन फर्नांडिस लवकरच एका म्युझिक व्हिडीओ अल्बममध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा व्हिडीओ अल्बम रिलीज होण्याआधीच लोकांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि हे कपल आवडायला लागलं आहे. जॅकलीननं सोशलवर अनेक बीटीएस व्हिडीओज आणि फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्सलादेखील त्यांच्या फोटोला पसंती दाखवत आहेत. अलीकडेच उर्वशी रौतेलानंही या जोडीवर कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/B9RZUVTHeHY/?utm_source=ig_embed

जॅकनं तिचा आणि आसिम रियाजचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर उर्वशीनं यावर कमेंट करत म्हटलं, क्युट कपल. उर्वशीलादेखील आसिम आणि जॅकलीनची जोडी आवडली आहे असं दिसतंय. जॅकलीन आणि आसिम होळीच्या म्युझिक व्हिडीओसाठी पेअर करण्यात आले आहेत. हा म्युझिक अल्बम 8 मार्च रोजी रिलीज केला जाणार आहे. आसिम आणि जॅकचे सेटवरील अनेक फोटो समोर येत असतात जे व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओतील जॅकचा इंडियन गेटअप आणि आसिमचा फॉर्मल लुक इम्प्रेसिव आहे.

https://www.instagram.com/p/B9Q_sU5Hd8A/

जॅकलीन नव्हे तर आसिमला आवडते ही

आसिम तर आधीच बिग बॉस स्पर्धक हिमांशी खुरानावर जीव ओवाळून बसला आहे. त्यांनी बिग बॉस 13 मध्येच हिमांशीला प्रपोज केलं होतं. शो संपल्यानंतर हिमांशीनं आसिमच्या कुटुंबाची भेटही घतेली होती. आसिमचा भाऊ उमर रियाजनं यानंह सांगितलं होतं की त्यांना या नात्यापासून काहीच अडचण नाही.