Urvashi Rautela | अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटात न झळकताही एन्जॉय करते लक्झरी लाईफ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटांपेक्षा त्याच्या स्टाईलमुळे व वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री व मॉडेल उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आहे. तसे पाहायला गेले तर उर्वशी बॉलीवुडमधील चित्रपटांमध्ये जास्त झळकली नाही. चित्रपटाचे यश जरी तिच्या पदरी प़डले नसले तरी ती कायम लाईमलाईटमध्ये राहिली आहे. उर्वशी (Urvashi Rautela) अभिनेत्री म्हणून जास्त चालली नसली तरी ती आजही लक्झरी आयुष्य जगते आहे व ती कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे.

उर्वशी रौतेला हिने 2009 साली ‘मिस टीन इंडिया’ (Miss Teen India,2009) हा किताब जिंकला होता. तेव्हा ती प्रकाशझोतात आली. तसेच तिने ‘मिस इंडिया प्रिन्सेस’ (Miss India Princess), ‘मिस टूरिझ्म वर्ल्ड’ (Miss Tourism World), ‘मिस इंडिया सुपरमॉडेल’ (Miss India Supermodel) असे अनेक स्पर्धा जिंकल्या असून हे किताब आपल्या नावी केले आहेत. अनेक ब्रॅंड सोबत मॉडेल व ब्रॅंड अम्बेसिडर (Brand Ambassador) म्हणून देखील तिने काम केले. बॉलीवुडमध्ये अभिनेत्री म्हणून तिने काम करण्याचा प्रयत्न केला. ‘सिंह साब द ग्रेट’ (Singh Saab The Great) या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यामध्ये तिने अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर तिने पागलपंती (Pagalpanti), सनम रे (Sanam Re), ग्रेट ग्रैंड मस्ती (Great Grand Masti), हेट स्टोरी 4(Hate Story 4) या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्यानंतर ती जास्त चित्रपटांमध्ये झळकली नाही. बॉलीवुडमध्ये ती हिरोईन (Bollywood Hot Heroine) म्हणून जास्त काळ टिकली नसली तरी ती महागड्या वस्तू, कार व ब्रॅडेड कपडे परिधान केलेली दिसून येते.

अभिनेत्री पेक्षा मॉडेल म्हणून उर्वशीने जास्त पैसे कमावले आहेत. उर्वशी गाण्यांच्या अल्बम मध्येही काम करते. उर्वशी एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपयांचे मानधन घेते तर एका गाण्यासाठी 60 ते 70 लाख रुपयांचे मानधन घेते. तसेच ती अनेक फॅशन व ब्युटी ब्रॅन्डसोबत काम करते. हे काम करणे तिच्यासाठी फायदेशीर ठरले आहे. अनेक ब्रॅन्डच्या सुपरकूल फॅशनमध्ये उर्वशी दिसून येते. यामधून तिची कमाई लाखो रुपये आहे. तसेच अभिनेत्री व मॉडेल उर्वशी रौतेला ही नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते.( Urvashi Rautela Controversy) चर्चेत राहण्याची एकही संधी उर्वशी सोडत नाही. ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते व तिथे ती आपल्या लाईफ अपडेट शेअर करत असते. उर्वशीच्या सौंदर्यावर अनेक लोक घायाळ असून तिचा तगडा चाहता वर्ग देखील आहे. याचा फायदा तिला आपली लाईफ स्टाईल सांभाळण्यासाठी होतो.

Web Title :   Urvashi Rautela | urvashi rautela lives a life of luxury despite the movie flop know her source of income

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध