अन् क्षणातच लखपती झाले आजोबा ! Pizza Delivery साठी टिप म्हणून मिळाले तब्बल 9 लाख

डहाट : वृत्तसंस्था –   पिझ्झा डिलिव्हरीसाठी एका आजोबांना तब्बल 9 लाखांची टीप मिळाली आहे. या टीपमुळं आजोबा काही क्षणातच लखपती झाले. वाचून नक्कीच तुम्हाला यावर विश्वास बसला नसेल. परंतु हे खरं आहे. 89 वर्षीय डेरलिन नीवी यांना पिझ्झा डिलिव्हरीसाठी तब्बल 12000 डॉलर्स म्हणजेच 9 लाख रुपये टीप मिळाली आहे. डेरलिन नीवी अमेरिकेच्या डहाटमध्ये पाप जोन्स ब्रँडच्या पिझ्झाच्या डिलिव्हरीचं काम करतात.

डेरलिन आठवडाभर जवळपास 30 तास पिझ्झा डिलिव्हरीचं काम करतात. काही आठवड्यांपूर्वी ते ग्लॅडी वाल्डेज यांच्या घरी पिझ्झा घेऊन गेले. ग्लॅडनं दरवाजा उघडताच डेरलिन यांना हाय गॉर्जस म्हटलं. ग्लॅडीचं कौतुकही केलं. ग्लॅडीला हे खूपच आवडलं. ग्लॅडीनं आपला पती कार्लोस वाल्डेजला या डिलिव्हरी मॅनबाबत सांगितलं. कार्लोस यांना डेरलिन यांचा हा स्वभाव आणि प्रामाणिकपणा खूप आवडला. त्यासोबत ते या वयातही पिझ्झा डिलिव्हरीचं काम करतात हे पाहून कौतुक वाटलं.

डेरलिन डिलिव्हरीसाठी आले तेव्हा वाल्डेज कुटुंबानं पोस्ट केला व्हिडीओ

कार्लोस यांनी आपल्या दरवाजाजवळ असलेल्या कॅमेऱ्याच्या फुटेजमधील डेरलिन यांचा व्हिडीओ आपल्या टिकटॉकवर पोस्ट केला. त्यांच्या फॉलोवर्सलादेखील डेरलिन आवडले. डेरलिनसाठी हजारो मेसेज आले. वाल्डेज कुटुबांनं यानंतर कित्येक वेळा पिझ्झा ऑर्डर केला आणि त्यांनी डिलिव्हरीसाठी डेरलिन यांनाच पाठवावं यावर जोर दिला. जेव्हा जेव्हा डेरलिन डिलिव्हरीसाठी आले तेव्हा तेव्हा वाल्डेज यांनी त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला.

फक्त 24 तासात 1 हजार डॉलरपेक्षा अधिक पैसे जमा

कार्लोस वाल्डेज यांना या डिलिव्हरी बॉयसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. त्यामुळं त्यांनी आपल्या टिकटॉक फेजवर क्राऊड फिडींग सुरू करण्याचा निर्णय घेतला. फक्त 24 तासातच एक हजारपेक्षा जास्त अधिक पैसे जमा झाले. एकूण 12000 हजार डॉलर्स जमा झाले. यानंतर वाल्डेज स्वत:च्या त्यांच्या घरी गेले आणि एका रिकाम्या पिझ्झा बॉक्समधून 12000 डॉलर्स दिले. पिझ्झाचा बॉक्स उघडताच डेरलिन यांच्या डोळ्यात पाणी आलं.