‘कोरोना’ महामारी दरम्यान US ने ‘सिक्रेट’ मिशनवर पाठवले ‘रहस्यमय’ विमान

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित असलेल्या अमेरिकेत सैन्याने आपले रहस्यमय अवकाश अभियान आधीसारखेच सुरू ठेवले आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, रविवारी अमेरिकन वायुसेनेने एक्स-३७बी अंतराळ यान एटलास व्ही रॉकेट लाँच केले असून ते एका सिक्रेट मिशन अंतर्गत या विमानाला अवकाशात पाठवत आहेत.

एक्स-३७बी विमान यापूर्वीही खूप काळ अवकाशात होते. यावेळी विमानाचे हे ६वे मिशन आहे. एक्स-३७बी हा एक क्लासिफाईड प्रोग्राम आहे, ज्याबद्दल फार कमी माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध आहे.

मात्र, या महिन्यात सेक्रेटरी ऑफ द एअर फोर्स बार्बरा बॅरेट म्हणाले होते की, या वेळी एक्स-३७बी पूर्वीच्या कोणत्याही मिशनपेक्षा जास्त प्रयोग करेल. यात अंतराळात बियाणे आणि इतर वस्तूंवर रेडिएशनच्या परिणामाचा देखील तपास केला जाईल.

एक्स-३७बी विमानाला ऑर्बिटल टेस्ट व्हेइकल असेही म्हणतात. हे अंतराळात एक सॅटेलाईट देखील लाँच करेल आणि पॉवर बीमिंग तंत्रज्ञानाचे परीक्षण करेल.

विशेष म्हणजे या वेळी वायुसेनेने एटलास व्ही रॉकेट लाँचला कोरोना पीडित आणि फ्रंट लाईन वर्कर्सला समर्पित केले होते. रॉकेटवर लिहिले होते- ‘अमेरिका स्ट्रॉंग’. कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत १४ लाख ८६ हजारहून अधिक लोक संक्रमित झाले असून ८९ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.