बगदाद : अमेरिकेची आणखी एक एअर स्ट्राइक, 6 जण ठार

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – इराकच्या बगदादमधील विमानतळावर हल्ला करुन इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी याचा खातमा केल्यानंतर शनिवारी सकाळी अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यात कालच्या प्रमाणानेच गाड्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. या हल्ल्यात ६ ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये कमांडर नाही तर डॉक्टरांचाही समावेश असल्याची माहिती अल जझिरा वाहिनीकडून देण्यात आली.

अमेरिकेने हा हल्ला बगदादजवळील ताजी रोजजवळ करण्यात आला आहे. या ठिकाणी ब्रिटन आणि इटलीच्या सैन्यांचे तळही असल्याचे सांगण्यात येत आहे. या हवाई हल्ल्यात दोन गाड्यांवर निशाणा साधण्यात आला. या गाड्यांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हशद अल शाबीचे काही लोक असल्याचे म्हटले आहे. हशद अल साबीचा कमांडर या गाड्यांमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.

गाडीतील सहाही जणांचा मृत्यु झाल्याचे इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इराकमधील सरकारी माध्यमांनीही या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हशद अल साबीला पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स म्हणूनही ओळखले जाते. याच्यांच ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. परंतु या ताफ्यात कोणताही सिनिअर कमांडर नव्हता. या हल्ल्यात काही डॉक्टरांचा मृत्यु झाल्याची माहिती या संघटनेने दिली आहे.

अमेरिकेने काल केलेल्या हल्ल्यात कासेम सुलेमान हा ठार झाला होता. त्यामुळे आयातुल्ला खोमेनी यांनी इराणमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्याचबरोबर टिष्ट्वट करुन अमेरिकेला इशारा दिला आहे. त्यामुळे आता पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/