Video : कुर्ता-पायजामा घालून अमेरिकन सैनिकांनी भारतीयांसह पंजाबी गाण्यांवर केला जबरदस्त डान्स, पहा व्हायरल व्हिडिओ
पोलीसनामा ऑनलाईन : सोशल मीडियावर सतत काहीतरी ट्रेंड होत असते. कोणता ना कोणता व्हिडिओ, फोटो एवढेच नव्हे तर व्यक्ती देखील इंटरनेट जगात व्हायरल होत असते. असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे, ज्यात अमेरिका आणि भारतचे सैनिक पंजाबी बीट्सवर नाचताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ बसंत पंचमीचा आहे जो राजस्थानात अमेरिका-भारत युद्ध अभ्यासादरम्यान रेकॉर्ड करण्यात आला होता.
Wonderful to see U.S. and Indian soldiers celebrate the Basant Panchami festival in the middle of the U.S.-India Yudh Abhyas defense exercises. This is what #USIndia defense cooperation is about — not just increased interoperability, but also stronger people-to-people ties. https://t.co/BDjMRXIsoR
— State_SCA (@State_SCA) February 16, 2021
व्हिडिओमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांनी शेरी मान यांच्या ‘3 पेग’ या पंजाबी गाण्यावर धमाकेदार नृत्य सादर केले. काही अमेरिकन सैनिकांनी कुर्ता-पायजामा देखील घातला होता. ही 38 सेकंदाची व्हिडिओ क्लिप यूएसएच्या ‘1-2 स्ट्रायकर ब्रिगेड कॉम्बॅट टीम’ ने ट्विटरवर शेअर केली होती. त्यांनी भारतीय सैन्याच्या ’11 व्या बटालियन जम्मू-काश्मीर रायफल्स’ला बसंत पंचमी साजरी करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल आभारही मानले.
व्हिडिओ अमेरिकन दूतावासाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा सैनिकांचा हा अंदाज आणि नाच खूप आवडला. आतापर्यंत ही क्लिप 1 लाखाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. लोक हा व्हिडिओ केवळ एकमेकांना शेअर करत नाहीत तर त्यावर विविध कमेंट्स व प्रतिक्रियाही देत आहेत.