अमेरिकेच्या आर्मीनं ‘बंदी’ घातली TikTok वर, राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘धोकादायक’ असल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन सैन्याने लोकप्रिय चिनी व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता यूएस लष्कराच्या सैनिकांना टिकटॉक वापरता येणार नाही. कारण, अमेरिकन सैन्याच्या म्हणण्यानुसार, हे चिनी व्हिडिओ अ‍ॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. लष्कर प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रॉबिन ओचोआ यांनी सांगितले की, टिकटॉक हे सायबर धोक्यासारखे आहे. लष्कराचा असा विश्वास आहे की Bytedance हे टिक टॉक अ‍ॅप अमेरिकन हेरगिरीसाठीही वापरले जाऊ शकते.

गेल्या महिन्यात, यूएस नेव्हीने त्याच्या सदस्यांमधील सरकारकडून दिल्या गेलेल्या डिव्हाइसमधून टिकटॉक अ‍ॅप हटवले. अहवालानुसार संरक्षण विभागाने आपल्या कर्मचार्‍यांना कोणताही अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेतही टिकटॉक अ‍ॅपची तपासणी सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये काही नेत्यांनी या अ‍ॅपच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता, त्यानंतर हा तपास सुरू केला आहे. हे चिनी अ‍ॅप वापरकर्त्याचा डेटा संकलित करीत आहे की नाही हा मुख्य तपासणीचा विषय आहे.

भारतात एकदा टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, भारतातील बंदीमागील कारण त्यात दर्शविलेली कन्टेन्ट आहे. मद्रास उच्च न्यायालयाने यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. कारण सांगितले गेले की, टिकटॉक अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहे, ज्याचा मुलांवर वाईट परिणाम होत आहे आणि त्याचा वापरकर्त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. नंतर टिकटॉकने हा कन्टेन्ट काढून टाकला आणि दावा केला की, आतापासून कंपनी त्याची काळजी घेईल आणि कंपनीने आपल्या धोरणातही काही बदल केले आहेत.

दरम्यान, टिकटॉकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे आणि तज्ञांचा असा विश्वास की, ज्या पद्धतीने त्याचा विस्तार होत आहे , त्यामुळे फेसबुकसारख्या कंपन्यांना टफ फाईट मिळू शकते. अलीकडे अशी माहिती समोर आली आहे की, टिकटॉकची मूळ कंपनी Bytedance फेसबुकच्या कर्मचार्‍यांना चांगली रक्कम देत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?