अमेरिकेचा इराकमध्ये ‘एअरस्ट्राईक’, केल्या इराण पुरस्कृत संघटना ‘टार्गेट’

बगदाद : वृत्तसंस्था – अमेरिकेने इराकमध्ये कातिब हिजबुल्लाह या संघटनेच्या स्थळांवर रॉकेट हल्ला केला आहे. कातिब हिजबुल्लाह संघटनेला इराणचा पाठिंबा आहे. या रॉकेट हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बुधवारी, इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला करण्यात आला होता. यामध्ये एका जवानासह दोन अमेरिकन आणि एका ब्रिटीश जवानाचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तरात ही कारवाई केल्याची माहिती आहे.

एका अमेरिकन लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले, कारवाई अद्याप सुरु आहे. शस्त्र ठेवलेल्या ठिकाणांना लक्ष करण्यात आले आहे. तर अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराकमधील अनेक प्रांतात अमेरिकेने हशद अल शाबीच्या ठिकाणांवर एअरस्ट्राइक केला आहे. यामध्ये ड्रोन व अन्य वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. ज्याच्या मदतीने अमेरिकन लष्करावर हल्ला करण्यात येत होता.

बुधवारी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला करण्यात आला होता. यामध्ये एका जवानासह दोन अमेरिकन आणि एका ब्रिटीश जवानाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी हल्लेखोरांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर अमेरिकन फौजांनी ही कारवाई केली आहे.