H-1B Visa : लाखों भारतीयांसाठी खुशखबर ! नागरिकत्व विधेयक 2020 अमेरिकेच्या संसदेत सादर, ‘ग्रीन कार्ड’ला मिळाला ग्रीन सिग्नल

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेच्या संसदेत ‘अमेरिकी नागरिकता बिल 2021’ सादर करण्यात आले. हे बिल पास झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांना ‘ग्रीन कार्ड’ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय इतर दुसऱ्या देशांतील नागरिक जे अमेरिकेत राहतात त्यांनाही ‘ग्रीन कार्ड’ मिळू शकते.

भारतीयांसाठी ‘डबल गिफ्ट’

अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांसह H-1B व्हिसावर राहणाऱ्यांना आता अमेरिकेत राहून काम करणाची परवानगी ‘अमेरिकी नागरिकता बिल 2021’पासून मिळणार आहे. अमेरिकेत सुमारे 5 लाख असे भारतीय राहत आहेत, ज्यांच्याकडे वैध दस्तावेज नाही. या कायद्यानंतर त्यांच्यासाठी नागरिकता मिळवण्याचे दरवाजेही उघडतील, असे एका अहवालातून सांगितले आहे.

बायडेन यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आशा

अमेरिकेत ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो भारतीय प्रोफेशनल्सलाही या कायदा बनल्यानंतर लाभ मिळणार आहे. अमेरिकेत जेव्हा ज्यो बायडेन यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा नागरिकता कायद्यावर लवकरच निर्णय होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संसदेत ‘नागरिकता बिल’ सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या बिलाचे रुपांतर लवकरच कायद्यात होईल, अशी आशा आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर कायदा

अमेरिकेच्या संसदेत ‘अमेरिकी नागरिकता बिल 2021’ सादर केले असून, आता अमेरिकेच्या दोन्ही सभागृहातील ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ आणि सिनेटमध्ये पास झाल्यानंतर हे बिल राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडे पाठविले जाणार आहे. राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर ‘अमेरिकी नागरिकता बिल 2021’ कायदा लागू केला जाणार आहे.