चीनवर ‘बहिष्कार’ घाला अन् उद्योग भारतात ‘शिफ्ट’ करा, अमेरिकेच्या खासदारानं सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनबद्दल अमेरिकेची वृत्ती अधिक तीव्र होत आहे. आता अमेरिकेच्या एका कॉंग्रेसमॅनने म्हटले की, चीनमध्ये उपस्थित असलेले उद्योग भारतात हलवावेत. जेणेकरून चीनशिवाय जगात एक पर्याय तयार होऊ शकेल. अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या उपसमितीचे सदस्य टेड योहो यांनी याबाबत म्हंटले आहे. टेड योहो म्हणाले की, अमेरिकेचे पहिले धोरण समान मानसिकता असलेल्या देशांना सोबत ठेवण्याचे आहे. आपले उद्योग चीनमधून कसे काढावे व ते भारतात स्थापित कसे करावे याची योजना अमेरिका आखत आहे. तसेच ज्या उद्योगांना अमेरिकेत परत यायचे आहे त्यांनी परत यावे. याचे ताजे उदाहरण म्हणजे जेव्हा संपूर्ण जगाला सर्वात जास्त पीपीई आवश्यक होते तेव्हा चीनने आपले हात वर केले. यामुळे संपूर्ण जगाचा पुरवठा बंद झाला. यानंतर आम्ही आपल्या राजदूतांशी बोललो आणि त्यांना सांगितले की, हा उद्योग चीनमधून शिफ्ट करून तो भारतात आणला जावा.

दरम्यान, आम्हाला भारतासारख्या अन्य भागीदार देशांमध्येही आपला उद्योग स्थापित करायचा आहे. यामुळे चीनचे वर्चस्व संपुष्टात येईल आणि आम्हाला बरेच पर्याय मिळतील. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया कार्यक्रम चालविला आहे. अशा परिस्थितीत हा उद्योग चीनमधून उठून भारतात आला तर त्याला मोठी गुंतवणूक मिळेल. या निर्णयामुळे चीनवर आर्थिक दबाव निर्माण होईल, असे कॉंग्रेसचे सदस्य टेड यांनी सांगितले. बीजिंग देखील पुरवठा साखळीपासून विभक्त होईल. मग आम्ही आमचे उद्योग विशेषत: पशुधन आणि एपीआय भारत आणि तत्सम देशांमध्ये हलवू. यामुळे चिनी अध्यक्ष शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षावर आर्थिक दबाव निर्माण होईल. टेड यांच्या म्हणण्यानुसार, जगाने चीनशी संबंध तोडले पाहिजेत. कारण चीन आपल्या लोकांच्या भल्यासाठी ज्या गोष्टी बोलतो त्या देशामध्ये किंवा इतर देशांमध्ये लागू होत नाहीत. आता चीन आपले नॉर्मल स्टॅंडर्ड बनवू शकत नाही. मी असे म्हणत नाही की, चीन आपल्यासारखे किंवा भारतासारखे असले पाहिजे, परंतु किमान आदर, मानवी हक्क आणि मानवतेची सवय तर लावावी.

टेड यांनी पुढे स्पष्ट केले की, केवळ चीनला जगाचा कारखाना म्हणावे, अशी अमेरिकेची इच्छा नाही. विकसित देशांमध्येही त्याचा समावेश व्हायला हवा. त्याला विकसनशील देशांसारख्या सुविधा मिळू नयेत. किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्ल्यूटीओ) कडून त्याला कोणतीही मदत मिळू नाही. चीनचा सिद्धांत असा आहे की, आकाशात दोन सूर्य असू शकत नाहीत. कोना एकाला हटावे लागेल. त्यांना स्वतःला महासत्ता म्हणून पहायचे आहे जेणेकरून ते उर्वरित जगावर राज्य करु शकतील. त्यांचे ध्येय जगाला आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याच्या बळावर बोटांवर नाचविण्याचे आहे.

चीन पाच युद्धनौका का तयार करीत आहे? त्याने आपले संरक्षण बजेट 6.9 टक्क्यांनी का वाढविले? असे प्रश्न उपस्थित करत टेड म्हंटले कि, चीन जागतिक व्यापार संघटनेच्या विकसनशील देशांच्या टॅगमागे लपून जगाला फसवत आहे. आता आमच्याकडे असा कायदा आहे की, आपण तेथून चीन काढून टाकू शकतो. चीन ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु तरीही विकसनशील देशांच्या टॅगच्या मागे लपत त्याचा फायदा घेत आहे. आता जगाने चीनला पाठिंबा देणे बंद केले पाहिजे. दरम्यान, अमेरिका चीनवर कडक घालण्याची तयारी करीत आहे. जेणेकरून तैवान, हाँगकाँग, दक्षिण चीन समुद्र आणि जागतिक आरोग्य संघटनेला खोटे अहवाल दिल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. आम्ही चीनच्या मोठ्या बँकांवर बंदी घालण्याची तयारी करत आहोत.