Coronavirus : COVID-19 मुळं 70 लाख मुलं जन्माला येणार, संयुक्त राष्ट्रानं सांगितलं त्याचं कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूएन पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए) आणि सहकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-१९ महामारी दरम्यान लागू लॉकडाऊन आणि आरोग्य सेवांमध्ये व्यत्यय आल्यामुळे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील ४.७ कोटी महिला आधुनिक गर्भनिरोधक उपायांचा वापर करू शकत नाहीत, यामुळे येत्या महिन्यात ७० लाख गर्भधारणा होतील.

एजन्सींचा असा अंदाज आहे की, संकटकाळात स्त्रियां कौटुंबिक नियोजन किंवा उत्स्फूर्त गर्भधारणा, लिंग-आधारित हिंसा आणि इतर हानीकारक प्रथांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. यूएनएफपीएच्या कार्यकारी संचालक नतालिया कानेम म्हणाल्या कि हे नवीन आकडे दाखवतात कि कोविड-१९ चा भयानक परिणाम जगभरातील महिला आणि मुलींवर दिसू शकतो. त्या म्हणाल्या की ही महामारी असमानता वाढवत आहे आणि लाखो महिला आणि मुलींवर कौटुंबिक नियोजन करण्याची क्षमता व त्यांचे शरीर व आरोग्याचे रक्षण करण्याची क्षमता यामुळे धोका निर्माण होत आहे.

या अभ्यासानुसार जगभरातील ११४ अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील सुमारे ४५ कोटी महिला गर्भनिरोधक वापरतात. त्यात म्हटले आहे कि लॉकडाउन संबंधित व्यत्ययाचा महत्त्वपूर्ण परिणाम ६ महिन्यांत दिसून येतो, जेथे निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ४.७ कोटी महिला आधुनिक गर्भनिरोधक वापरण्यास असमर्थ आहेत आणि ७० लाख अतिरिक्त अवांछित गर्भधारणा होऊ शकतात. जर लॉकडाऊन ६ महिन्यांपर्यंत राहिले तर यामुळे लिंग-आधारित गुन्ह्यांमध्ये अतिरिक्त ३.१ कोटी प्रकरणं वाढू शकतात.