US : 16 व्या वर्षीच बनला बाप, नवजात मुलीला कडाक्याच्या थंडीत सोडलं अन् डोक्यात घातल्या गोळया

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – येथील एका बापाने त्याच्या नवजात मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उलट्या काळजाच्या या बापाने पहिल्यांदा त्याच्या मुलीला बर्फाच्छादित झाडाजवळ सोडले. त्यानंतर मुलगी मरत नाही, हे पाहिल्यावर त्याने तिच्यावर दोनदा गोळ्या झाडल्या. याप्रकरणी मुलीच्या अल्पवयीन बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुलीचा सांभाळ करण्यास सक्षम नसल्याच्या कारणावरुन आरोपीने त्याच्या बायकोच्या साहाय्याने मुलीला मारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीस बाळाला कडाक्याच्या थंडीत बर्फाच्छादित झाडाच्या जवळ सोडले. थंडीतही नवजात बाळाचा मृत्यू झाला नाही, हे पाहून त्यानं बाळाच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. नंतर त्याने मृतदेह लवपण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पोलिसांना रविवारी रात्री या बाळाचा मृतदेह आणि दोन रिकामी काडतुसे सापडली. तपास झाल्यावर तिच्या अल्पवयीन बापालाही अटक करण्यात आली.

५ जानेवारीला झाला होता जन्म
या मुलीचा जन्म ५ जानेवारीला एका बाथटबमध्ये झाला होता. त्यांनी सुरुवातीला हे बाळ दत्तक देण्याची योजना केली होती. मात्र, यशस्वी झाली नसल्याने जोडप्याने नवजात मुलीची हत्या केल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली. दरम्यान, आरोपीने सातत्याने त्याची जबानी बदलली आहे. स्थानिक कोर्टाने त्याचा जमीन अर्ज फेटाळला असून, याप्रकारची पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी होणार आहे.