US Elections 2020 : ‘हॅलो, मी बराक ओबामा बोलतोय…’, व्हिडीओ व्हायरल

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा राष्ट्रध्यक्षपदी विराजमान होतील का, याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. तथापि, काही राजकीय जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होतील, असे सांगितले जात आहे. तर जो बायडेन यांचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डेमोक्रॉटिक पक्षाचे उमेदवार यांच्यासाठी मतदारांना फोन करून मतदानाचे आवाहन करत आहे. त्याच संबंधीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात ओबामा एका महिला मतदारास डेमोक्रॉटिक पक्षाच्या उमेदवारासाठी मतदान मागत आहेत.

काय म्हटलंय व्हिडिओत !
एलिसा नावाच्या महिला मतदारास बराक ओबामा यांनी फोन करुन आश्चर्याचा धक्का दिला. फोनवर बोलताना ओबामा यांनी ओळख करून देत म्हटलं की मी बराक ओबामा बोलतं आहे, मी राष्ट्रपती होतो, आठवते का ? मग ती बाई हसून म्हणाली, होय मला आठवते. मग ओबामा म्हणाले, की मी जो बायडेन यांच्यासाठी फोन बँकिंग करत आहे आणि ज्यांना मी कॉल करत आहे त्यातील तुम्ही एक आहात.

दरम्यान, मंगळवारी (३ नोव्हेंबर) ला होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डेमोक्रॉटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही उमेदवारांनी लोकांना अशावेळी मतदारांना आवाहान केलं आहे ज्यावेळी राष्ट्रात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. ज्याचा उल्लेख प्रत्येक टप्प्यात आढळून येत आहे.

मतदान कसे होणार ?
३ नोव्हेंबरला अमेरिकी निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा असून अमेरिकेतील सिनेटच्या ३५ जागा, अमेरिका काँग्रेसच्या ४३५ जागा याशिवाय अकरा राज्यांचे गव्हर्नर यासाठी मतदान होत आहे. एकूण १० कोटी मतदारांनी यापूर्वीच मतदान केले असून काहींनी व्यक्तिगत पातळीवर, काहींनी टपालाने व मतपेटीतून मतदान केले.

२०१६ मधील निवडणुकीत जे मतदान आधीच झाले होते त्यापेक्षा हे प्रमाण ६४ टक्के आहे, मतदारांचा उत्साह अधिक असून मोठ्या प्रमाणावर मतदान यावेळी झाले. ९ .३२ कोटी मतदान आधीच मतपत्रिकेने झालेले असून ३.१९ कोटी मतदारांनी टपालाने मतदान केले आहे म्हणजे एकूण १० कोटीहून अधिक मतदान झाले आहे. एकूण मतदार २४ कोटी आहे.