US Elections 2020 : लोकप्रियतेमध्ये ज्यो बायडन यांचीच आघाडी, संपुर्ण जगाचे अध्यक्षीय निवडणूकीच्या निकालांकडे लक्ष

 वॉंशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. दरम्यान, लोकप्रियतेत बायडन यांनी ट्रम्प यांना मागे टाकल्याचे विविध कल चाचण्यातून समोर आले आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

कोरोना संकटाने अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला आहे. अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले तर काहींनी टपली मतदानाला पसंती दिली. आतापर्यंत ९ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर लगेचच अध्यक्षपदी कोणाची निवड झाली समजू शकणार नाही कारण, टपाली मतदान मोजण्यासाठी किमान दोन आठवडे तरी लागणार आहे. त्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल.

अनेक कल चाचण्यांचे अहवाल प्रसिद्ध होऊ लागले आहे त्यामध्ये बायडन आघाडीवर असल्याचे दिसत आहे. अनेक राज्यांनी बायडन यांना झुकते माप दिल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, ट्रम्प यांची सर्व मदार अरिझोना, पेन्सिलव्हेनिया, फ्लोरिडा, विस्कोनींस आदी राज्यांवर आहे. मात्र, या राज्यांनीही बायडन यांच्याच पसंतीचे संकेत दिले आहेत.