ज्यानं गेल्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लावला होता ‘डाव’, त्या ’निवडणूक पंडित’ने यावेळी केली ही भविष्यवाणी

नवी दिल्ली : अमेरिकन निवडणूक 2020 ला आता अवघे काही आठवडे राहिले आहेत. यावेळी जगभरातील लोकांचे लक्ष सर्वात शक्तीशाली देशाच्या निवडणुकीकडे लागले आहे. लोक आपसातही चर्चा करत आहेत की यावेळी अमेरिकेची सत्ता कुणाच्या पारड्यात जाणार. जो बिडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अमेरिकन निवडणूक 2020 च्या रणधुमाळीत एक पोलिंग गुरु सुद्धा चर्चेत आहे. हा तो पोलिंग गुरु आहे ज्याने 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकतील अशी घोषणा केली होती. डेव वासरमॅन (Dave Wasserman) ने 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती, जी अखेर खरी ठरली.

2020मध्ये कठिण आहे, डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग
यावेळी वासरमॅनने रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची नव्हे, तर विरोधी डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बिडेन यांच्या विजयाची भविष्यवाणी केली आहे. पोलिंग गुरुचे म्हणणे आहे की, 4 वर्षांपूर्वी झालेल्या अमेरिकन निवडणुकीच्या तुलनेत 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे स्थिती कमजोर आहे.

या 6 राज्यांची जनता ठरवेल बिडेन आणि ट्रम्प यांचे भवितव्य
डेमोक्रेटिक पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बिडेन विस्कॉन्सिनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जबरदस्त टक्कर देत आहेत. ट्रम्प या आठवड्यात मिशिगन, पेनिसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिसह नेब्रास्का, एरिजोना आणि नेवाडाचा दौरा करत आहेत. अमेरिकन निवडणुकीबाबत वासरमॅनने भविष्यवाणी केली आहे की, विस्कॉन्सिन, पेन्सिल्वेनिया, मिशिगन, उत्तर कॅरोलिना, फ्लोरिडा आणि एरिजोना सारख्या 6 राज्यांतील जनतेची बिडेन कि टम्प हे ठरवण्यात महत्वाची भूमिका असेल.

ट्रम्प यांच्यावर आघाडी कायम ठेवून आहेत जो बिडेन
पोलिंग गुरुने सप्टेंबर महिन्याच्या सर्वेचा लक्षात घेऊन म्हटले होते की, बिडेन आपले विरोधक ट्रम्प यांच्यावर किंचित आघाडीवर आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वेत ट्रम्प यांच्यावर जो बिडेन 7 किंवा 8 अंकाच्या सरासरीने आघाडीवर आहेत. सर्वेनुसार फ्लोरिडामध्ये बिडेन यांनी ट्रम्प यांच्यावर 1.5 टक्केची मामूली वाढ मिळवली आहे.

अर्थव्यवस्थेवरून ट्रम्प यांच्यावर टीका
जो बिडेन यांनी ऑक्टोबरमध्ये आपल्या भाषणात ट्रम्प यांना त्यांच्या अनेक चुकांसाठी निशाणा बनवले. ऑक्टोबरपासून जो बिडेन यांचा प्रभाव ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त वाढला आहे. कारण या दिवसात ट्रम्प अमेरिकेत कोरोना महामारीचा प्रकोप आणि अर्थव्यवस्थेवरून टीका झेलत आहेत. यामुळे जो बिडेन लोकांना पसंत येत आहेत.