आता तर कायद्याची लढाई सुरू झालीय, बायडन यांनी जबरदस्तीने करू नये व्हाइट हाऊसवर दावा : ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या निवडणुकीनंतर तीन दिवस उलटले आहेत, परंतु हे समजलेले नाही की, पुढील चार वर्षांसाठी युएसचा बिग बॉस कोण असेल. नासा, अ‍ॅप्पल आणि गुगलवाल्या देशाची लोकशाही सध्या सर्वात महत्वाच्या प्रक्रियेत निवडणुक गडबडीच्या आरोपाचा सामना करत आहे.

या दरम्यान, सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि पराभवाच्या काठावर असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले प्रतिस्पर्धी जो बायडन यांना धमकीच्या सूरात म्हटले आहे की, त्यांनी जबरदस्तीने आणि चूकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करू नये. असा दावा ते सुद्धा करू शकतात. आता तर कायद्याची लढाई सुरू झाली आहे.

डेमोक्रेट उमेदवार जो बायडन यांना विजयाच्या दरवाजावर पोहचूनही ताटकळ राहावे लागले आहे. 264 इलेक्टरोल मतांसह बायडन यांना आणखी 6 मते आहेत. ते सध्या चार राज्यांत आघाडीवर आहेत, तर ट्रम्प यांची आघाडी एकमेव राज्यात आहे. म्हणजे आतापर्यंतच्या निकालावरून बायडन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

दुसरीकडे ट्रम्प सुद्धा आडून बसले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी रात्री एका पाठोपाठ एक तीन ट्विट केली. नेवाडामध्ये मागे पडल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, जॉर्जियाची मिसिंग मिलिट्री बॅलेट्स कुठे आहेत, त्याचे काय झाले? सांगा की, येथे ट्रम्प पुढे होते, परंतु नंतर बायडन यांनी आघाडी घेतली. आता नेवाडामध्ये पुन्हा मतमोजणी होत आहे.

पुढील ट्विटमध्ये ट्रम्प यांनी म्हटले, जो बायडन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करू नये, असे मी सुद्धा करू शकतो, आता तर कायद्याची लढाई सुरू झाली आहे.

ट्रम्प यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत म्हटले आहे की, निवडणुकीच्या रात्री या सर्व राज्यांमध्ये मोठी आघाडी होती, परंतु जसा दिवस सरला, आघाडी रहस्यमय प्रकारे गायब होत गेली. ट्रम्प यांनी म्हटले की, जसजशी आमची कायद्याची लढाई पुढे सरकेल ही आघाडी परत येईल.

आतापर्यंत जो बायडन यांनी 264 इलेक्टोरल मते जिंकली आहेत, तर ट्रम्प यांच्या खात्यात 214 मते आहेत. 77 वर्षांचे जो बायडन सध्या 4 राज्यांमध्ये आघाडीवर आहेत, ती राज्य ही राज्य आहेत जेथे असजूनही मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे. ही राज्य आहेत एरिझोना, जॉर्जिया, नेवाडा आणि पेनिसिल्व्हेनिया. तर ट्रम्प यांना नॉर्थ कॅरोलिनामध्ये आघाडी मिळाली आहे.