Coronavirus : ‘कोरोना’बद्दल अमेरिकेतील जाणकारांनी केला आश्चर्यकारक खुलासा, सांगितली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगात 51 लाख 9 हजार 937 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 3 लाख 30 हजार 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 लाख 38 हजार 359 रुपये बरे झाले आहेत. अमेरिकेबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या चोवीस तासांत येथे 22 हजार 140 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. तर 1561 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह येथे संसर्ग बाधितांची संख्या 15 लाख 91 हजार 991 झाली असून मृतांची संख्या 94 हजार 994 वर पोहोचली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने चिंता व्यक्त करताना म्हंटले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हिवाळ्यामध्ये पुन्हा एकदा अमेरिकेला बसू शकेल. अशा परिस्थितीत अमेरिकेत पुन्हा कोरोना पसरला तर संपूर्ण जगाला या धोक्याचा सामना करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन सरकारी एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) चे प्रमुख डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी म्हटले की, दक्षिण गोलार्धात कोविड 19 प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यावरून अशी भीती आहे की, शरद ऋतू आणि हिवाळ्यात अमेरिकेत कोरोनाचा पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेला येत्या काही महिन्यांत साथीचे रोग शोधण्याची क्षमता वाढवावी लागेल. जर तसे झाले नाही तर कोविड – 19 आणि हंगामी फ्लू या दोन्ही गोष्टी एकत्र येण्याचे संकट उद्भवू शकते.

डॉ. रॉबर्ट म्हणाले, ‘आम्ही या गोष्टींचे पुरावे पहिले आहेत, हे पहिल्या फ्लूप्रमाणे दक्षिणी गोलार्धात जाईल, जसे आता ब्राझीलमध्ये आहे. जेव्हा दक्षिण गोलार्धात त्याचा उद्रेक पूर्ण होईल, तेव्हा मला भीती वाटते की ते पुन्हा उत्तर गोलार्धच्या दिशेने जाईल. डॉ. रॉबर्ट म्हणाले की कोरोना विषाणूमुळे अमेरिकेने गुडघे टेकले आहेत. खरं सांगायचं तर कोना एक व्यक्तीची चूक नाही. अमेरिका कित्येक दशकांपासून अशा प्रकारच्या संकटासाठी तयार नव्हती.

पुढच्या वर्षी जून-जुलै पर्यंत नाही येणार कोरोनाची लस
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय पेंटागॉनच्या कागदपत्रांनुसार असे म्हटले आहे की, 2021 मध्ये कोरोनाची लस जून-जुलैपर्यंत उपलब्ध होणार नाही. त्याच वेळी, कोरोना पुन्हा एकदा तीव्रतेने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.