इराणवर सैन्य कारवाई करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना ‘कात्री’, अमेरिकेच्या संसदेत ‘हा’ प्रस्ताव मंजूर

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन – आता इराणविरोधातील लष्करी कारवाईसंबंधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या अधिकारांचा पूर्ण वापर करू शकणार नाहीत. कारण, अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझन्टेटिव्हने गुरूवारी युद्ध अधिकारांबाबत एक प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावात काँग्रेसच्या सहमतीशिवाय इराणविरोधात लष्करी कारवाई करण्याच्या ट्रम्प यांच्या अधिकारांना सिमित करण्यात आले आहे.

संसदेत हा प्रस्ताव 224-194 मतांनी मंजूर झाला. हा प्रस्ताव काँग्रेसच्या एलिझा स्लॉटकिन यांनी मांडला होता. यापूर्वी स्लॉटकिन यांनी शिया मिलिशियामध्ये विशेष सीआयए म्हणून काम केले आहे. तसेच त्या अंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांसाठी कार्यकारी सुरक्षा सहाय्यक सचिवही होत्या. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर मिसाईल हल्ला केल्यानंतर हा प्रस्ताव आणण्यात आला. सुलेमानी यांना पेंटॅगॉनच्या आदेशानंतर बगदाद अंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एयर स्ट्राईक करून ठार मारण्यात आले होते.

यापूर्वी अमेरिकन संसदेच्या स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांनी ट्विट करून सुलेमानी यांच्या हत्येला भडकाऊ आणि विसंगत म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, स्ट्राईक करण्याचा हा निर्णय काँग्रेसशी विचारविनिमय न करताच घेण्यात आला होता, ज्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे.

जग आणखी एक युद्ध सहन करू शकत नाही
यूएन प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणमध्ये वाढलेला तणाव पाहता संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी म्हटले आहे की, जग आणखी एक युद्ध सहन करू शकत नाही. आम्ही तणाव कमी करण्यासाठी आणि युद्ध थांबविण्यासाठी संबंधित देशांशी चर्चा सुरू ठेवणार आहोत.

गुटेरस यांनी संपूर्ण खाड़ी क्षेत्रात तणाव वाढल्यानंतर शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी जागतिक नेत्यांना आपला चारसूत्री संदेश देताना म्हटले की, तणाव नष्ट करा, संयम बाळगा. चर्चा पुन्हा सुरू करून अंतरराष्ट्रीय सहकार्याला नव्याने पुढे न्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/