अमेरिकन गुप्तचर संचालकांचा मोठा खुलासा ; आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या जगावर वर्चस्व गाजवण्याचा प्लॅन बनवतोय चीन !

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे प्रमुख गुप्तचर अधिकार्‍याने म्हटले की, दुसर्‍या महायुद्धानंतर चीन लाेकशाही आणि स्वातंत्र्याला सर्वांत मोठा धोका आहे आणि बीजिंग अमेरिकेला धडक देण्याची तयारी करत आहे. त्यांनी म्हटले की, चीनचा हेतू आर्थिक, लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्ट्याने जगावर वर्चस्व गाजवण्याचा आहे. राष्ट्रीय गुप्तचर संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित आपल्या एका लेखात म्हटले आहे की, चीन अमेरिकेची गुप्त माहिती चोरी करून आपली शक्ती वाढवत आहे आणि त्यानंतर बाजारातून अमेरिकन कंपन्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे.

ट्रम्प प्रशासनाने चिनी उत्पादनांवर शुल्क लावणे आणि बौद्धिक संपदा चोरी करण्याचा आरोप करत चीनविरोधात कठोर भूमिका घेतली होती. रॅटक्लिफ यांनी म्हटले, गुप्त माहिती स्पष्ट आहे : बीजिंग, अमेरिका आणि अन्य जगावर आर्थिक, लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वर्चस्व गाजवण्याचा हेतू आहे. चीनचे अनेक प्रमुख सार्वजनिक उपक्रम आणि प्रमुख कंपन्या चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या हालचालींसाठी आवरणाचा एक स्तर सादर करतात.

ट्रम्प प्रशासनाने चीनवर केली कारवाई
ट्रम्प प्रशासनाने नुकतीच चीनच्या विरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. अमेरिकेने चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसाठी विजावर मर्यादा आणल्या आणि अनेक चिनी कंपन्यांवर नवीन प्रतिबंध लावले आहेत. ट्रम्प प्रशासनाने चीनला या वर्षाच्या सुरुवातीला ह्यूस्टन येथील आपला व्यापार दूतावास बंद करण्याचासुद्धा आदेश दिला होता. कारण आरोप होता की, त्या मिशनचे चिनी मुत्सद्दी अमेरिकन नागरिकांना धमकावत होते आणि हेरगिरीचा प्रयत्न करत होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला आपला सर्वांत मोठा शत्रू असे म्हटले होते. रॅटक्लिफ यांनी म्हटले आहे की, चीन मोठ्या कालावधीपासून अमेरिकेला धडक देण्याचा प्रयत्न करत आहे.