US – इराण नंतर आता चीन – इंडोनेशियामध्ये ‘तणाव’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका इराणमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर आता चीन आणि इंडोनेशियामध्ये देखील मोठा तणाव निर्माण झालेला आहे. यावेळी इंडोनेशियन नतूना द्वीपसमूहवर अनेक मोठी जहाजे आणि लढाऊ विमान तैनाद केलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण चीन समुद्रातील एका बेटावर आपला अधिकार सांगण्यासाठी अनेक युद्धनौका आणि लढाऊ विमान नतुना बेटांवर तैनात केले आहेत. एवढेच नाही तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडोही तेथे पोहोचले आहेत.

राष्ट्राध्यक्ष विडोडो यांचे आगमन होण्यापूर्वीच इंडोनेशियन सैन्याने आपली फौज तैनाद केली होती. तेथे पोहोचल्यावर विडोडो म्हणाले की या बेटावर फक्त इंडोनेशियाचाच हक्क आहे. तर या प्रदेशात इंडोनेशिया व्यतिरिक्त व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि मलेशियाशीही वाद आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणाहून चीनची विमाने अनेकदा गेली त्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे, चीन, संपूर्ण दक्षिण चीन सागरी प्रदेशावर आपली मक्तेदारी असल्याचे प्रतिपादन करीत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मुख्य मार्गाशिवाय या भागाला माशाचा मोठा साठा मानला जातो.

काय आहे दक्षिण चीन सागराचे प्रकरण
याठिकाणावर चीन नेहमीच आपला हक्क असल्याचे सांगत आहे. इंडोनेशिया आणि व्हिएतनामच्या मध्ये येणारा समुद्री हिस्सा 35 लाख वर्ग किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. या हिश्श्यावर चीन, फिलीपींस, वियतनाम, मलेशिया, ताईवान आणि ब्रुनेई आपला दावा करतात. गेल्या चार वर्षणापासून हा तणाव वाढतच चाललेला आहे.

चीनने बनवले बंदर
चीनने वाळू, विटा आणि काँक्रीटच्या मदतीने छोट्या समुद्राच्या पट्ट्याभोवती मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले, प्रथम एक बंदर तयार केले आणि त्यानंतर विमानांच्या लँडिंगसाठी हवाई पट्टी बनविली.

हळू हळू बनवला सैनिकांचा अड्डा
त्यानंतर लवकरच चीनने दक्षिण चीन समुद्रात एक कृत्रिम बेट तयार केले आणि त्यावर सैन्य तळ बांधला. या भागात, हळूहळू चीनने अनेक लहान बेटांवर लष्करी तळ बांधले, मग मोठ्या वादाला सुरुवात झाली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/