… म्हणून सोनं महागलं, गाठला 40500 चा टप्पा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्याचे आता त्याचा परिणाम भारतीय व्यापारावर दिसू लागला आहे. हाच परिणाम म्हणून आज देशात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याच्या दरात आज विक्रमी वाढ होऊन सोनं जवळपास 40,500 रुपयांवर पोहचले.

दोन देशांमधील तणावाचा परिणाम डॉलरवर देखील झाला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला. त्यामुळे सोने खरेदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढाला आहे. याच कारणाने आज सोने भाव खाऊन गेलं. आज सोने 40 हजार पार गेले. जळगावात आज सोन्याचे दर 40,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. अमेरिका – इराण या देशातील तणाव आणखी काही दिवस निवळणार नाही. त्यामुळे सोन्याचे दर येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढल्याने काल देखील सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी आली होती. एका दिवसात सोन्याचे दर 752 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. तर चांदी देखील 960 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. तज्ज्ञांच्या मते अमेरिकाकडून इराणवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानीच्या मृत्यूमुळे देशात तणाव वाढला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळत आहेत. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/