‘या’ राष्ट्रीय प्राण्याची शिकार केल्याने त्यााला भरावा लागला 78 लाखांचा दंड

वृत्तसंस्था : पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या मारखोरची शिकार केल्या प्रकरणी एका अमेरिकन व्यक्तीला 1, 10,000 डॉलर (78 लाख)चा दंड भरावा लागल्याची घटना समोर आली आहे. मारखोरची शिकार करणाऱ्या या अमेरिकन व्यक्तीला परमिट शुल्काद्वारे 78 लाख रुपये भरावे लागले आहेत. मारखोर हा प्राणी पाकिस्तानच्या सुरक्षित प्राण्यांच्या प्रजातीच्या अंतर्गत येतो. या प्राण्याच्या शिकाराची परवानगी नाही. जी रक्कम या व्यक्तीने भरली आहे ती रक्कम म्हणजे पाकिस्तानमध्ये शिकारीच्या परमिटसाठी मिळालेली सर्वात मोठी रक्कम आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, फक्त ट्रोफी हंटिंग कार्यक्रमांतर्गत सरकार या राष्ट्रीय प्राण्याच्या शिकारीची परवानगी देते. ट्रोफी हंटिंग पर्व 2018-19 मध्ये आतापर्यंत देश-विदेशातील शिकाऱ्यांनी 50 जंगली जनावरांची शिकार केली आहे. या कार्यक्रमांतर्गत गेल्या महिन्यातही पाकिस्तानच्या सर्वोच्च प्रजातीच्या मारखोर प्राण्याची शिकार केली होती. ज्यासाठी अमेरिकन नागरिकाला 1,05,000 आणि 1,00,000 डॉलरचं परमिट शुल्क मोजावे लागले आहेत.

दरम्यान जी रक्कम सरकारला परमिट शुल्काद्वारे मिळते प्रशासन त्यातील 80 टक्के रक्कम स्थानिकांना देतं. याशिवाय यातील जी उर्वरीत रक्कम आहे ती रक्कम त्या जनावरांच्या देखभालीसाठी खर्च केली जाते. जनावरांचं संरक्षण करण्यासाठी स्थानिक लोकांना ही रक्कम दिली जाते. त्यांना पैसे देऊन जनावरांची शिकार करू नये यासाठी प्रोत्साहित केले जाते. पाकिस्तान सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, हंटिंग ट्रोफी कार्यक्रमामुळे मारखोर प्राण्याची शिकार कमी झाली असून, त्यांची संख्या पहिल्यापेक्षा वाढली आहे. थायलंडचा अधिकृत आणि राष्ट्रीय पशू हत्ती आहे. तर मंगळवारी सियामीज फायटिंग फिशला त्यांनी राष्ट्रीय जलजीव घोषित केलं आहे.