एकटा US जागतिक आव्हांनाचा सामना करू शकत नाही, भारताची साथ महत्वाची असल्याचं अमेरिकन परराष्ट्र विभागानं केलं ‘कबूल’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   एकटा अमेरिका जागतिक आव्हानांचा सामना करू शकत नाही. त्यासाठी भारताची साथ अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं कुणीही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झाले तरी त्यांच्यासाठी भारताची साथ अत्यंत महत्त्वाची असेल असं अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस (Morgan Ortagus) यांनी म्हटलं आहे.

मॉर्गन म्हणाल्या, “हे दोन्ही देश संयुक्तपणे बलशाली आणि सुरक्षित राष्ट्र आहेत. जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी हे दोन्ही देश संयक्तपणे काम करत आहेत. विशेष करून इंडिया पॅसिफिक भागातील चीनचं प्रभुत्व कमी करण्याच्या दृष्टीन” असंही त्यांनी सांगितलं.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “संपूर्ण जग लोकशाही मुल्यांसाठी संघर्ष करत आहे. लोकशाही कुठल्याही स्वरूपात परिपूर्ण नाही. मात्रा यात उत्तरदायित्व व पारदर्शकतेचाही सहभाग आहे.

‘कुठल्याही राजकीय पक्षाच्या दयेवर भारत-अमेरिका संबंध अवलंबून नाहीत’

मॉर्गन म्हणाल्या, “अमेरिका आणि भारत संबंध पूर्वीपेक्षाही बळकट झाले आहेत. तसंच ते भविष्यात आणखी बळकट आणि मधुर होतील. एवढंच नाही तर या संबंधाच्या पाठीमागे कुण्या राजकीय पक्षाचा अथवा एखाद्या व्यक्तीचा हात नाही. आता या दोन्ही देशांमधील संबंध राजकीय पक्षाच्या विचारधारेपेक्षा वरचे आहेत. हे कुठल्याही प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल.”

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “3 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाचा विजय होवो वा रिपब्लिकन पक्षाचा त्यांना भारताशी मधूर संबंध ठेवावेच लागतील. एवढंच नाही तर अमेरिकन लोकांना माहित आहे की, अमेरिका आणि भारत एकत्रितपणे अत्यंत मजबूत स्थितीत आहेत. ते दोघंही अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. एवढंच नाही तर हे दोन्ही देश एकत्रिपणे सुरक्षित आहेत” असंही मॉर्ग म्हणाल्या.