जपानची 22 वर्षीय नाओमी दुसर्‍यांदा झाली US Open चॅम्पियन, मिळाले 22 कोटींचे बक्षीस

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – पानची 22 वर्षीय नाओमी ओसाकाने दुसर्‍यांदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे. फायनलमध्ये ओसाकाने बेलारूसच्या विक्टोरिया अजारेंकाला हरवले. पहिला सेट गमावल्यानंतर नाओमीने जबदरस्त कमबॅक करत सलग दोन सेट जिंकले. नाओमीने अजारेंकाला 1-6, 6-3, 6-3 ने हरवले आहे. त्यामुळे तिला 22 कोटींचे बक्षीसही देण्यात आले आहे.

अमेरिकन ओपनचा महिला एकेरी फायनल सामना युएसटीए बिली जींस किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे खेळवला गेला. 22 वर्ष असलेल्या नाओमीने जिंकलेली ही तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. याआधी तिने 2018 अमेरिकन ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा नावावर केली होती. तर, विक्टोरिया अजारेंकाला तिसर्‍यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अजारेंकाने 2012 आणि 2013 अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पोहचली होती. दोन्ही वेळा अजारेंकाला सेरेन विलियम्सने हरवले. 1994 नंतर पहिल्यांदा कोणत्या तरी महिला खेळाडूने पहिला सेट गमावल्यानंतर अमेरिकन ओपन ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी सेमीफायनलमध्ये नाओमीने अमेरिकेच्या जेनिफर ब्रँडीला हरवत फायनलमध्ये आपली जागा मिळवली होती. ओसाकाने जेनिफरला 7-6(1), 3-6, 6-3 नमवत फायनलमध्ये प्रवेश केला होता.