जिगरबाज ! भारताच्या सुमितनं दिली रॉजर फेडररला टक्कर, कडवी ‘झुंज’ देत सर्वांची मनं ‘जिंकली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ या वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं रॉजर फेडररला कडवी झुंज दिली. २०१५ च्या ज्युनिअर विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेत सुमित नागलनं विजेतेपद पटकावलं होतं.

टेनिसच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉजर फेडररला सुमितने पहिल्याच सेटमध्ये घाम फोडला. सुमितने उत्तम कामगिरी करत फेडररला पहिल्याच डावात मागे टाकले. पण उर्वरित सेट फेडररने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम फेडररच्या नावावर आहे. पहिल्या फेरीत जबरदस्त सुरुवात केल्यानंतर सुमितनं त्यानंतरचे तीन सेट गमावले.

सुमित नागलनं पहिल्या सेटमध्ये 6-4 अशा फरकानं फेडररवर मात केली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये फेडररनं एकतर्फी वर्चस्व गाजवलं. चौथ्या सेटमध्ये सुमित नागलनं शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अनुभवी फेडरर समोर त्याचा निभाव लागू शकला नाही आणि फेडररने चौथा सेट जिंकत सुमितचा पराभव केला.

फेडररनं ४-६, ६-१, ६-२, ६-४ अशा फरकानं सुमितचा पराभव केला. पहिला आणि शेवटचा सेट फेडररला सुमित विरोधात जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

आरोग्यविषयक वृत्त –