home page top 1

भारतीयांचा उत्साह पाहून टेनिस खेळाडू रॉजर फेडरर म्हणाला ‘I Love India’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वित्झर्लंडचा प्रसिद्ध टेनिस खेळाडू रॉजर फेडरर याने त्याच्या सोशल मीडियावरून भारतीय पाठिराख्यांसाठी एक व्हिडीओ टाकला असून यात त्याने भारतीयांचे कौतुक केले आहे. फेडरर सध्या अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला असून त्याआधी त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जर त्याने या स्पर्धेत विजय मिळवला तर त्याचा अमेरिकेन ओपनचे हे सहावे विजेतेपद ठरेल.

या व्हिडिओत त्याने भारतीयांचे कौतुक करताना म्हटले कि, भारतातील खेळाडू हे सर्वात जास्त ऊर्जा आणि प्रेरणादायी खेळाडू आहेत. मला भारत खूप आवडतो. मी या देशात फिरायला आणि सामना खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे. येथील लोकं मला नेहमीच  साथ देतात. त्याचबरोबर हा देश खूपच उर्जावान आहे. फेडररने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याने आतापर्यंत ३ वेळा भारताचा दौरा केला असून 2006, 2014 आणि 2015 मध्ये भारत दौरा केला होता.

भारतीय खेळाडूची जबरदस्त टक्कर

सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपनमधील पहिल्या फेरीत फेडररच सामना हा भारताचा नवोदित टेनिस खेळाडू सुमित नागल याच्याशी झाला होता. या सामन्यात सुरुवातीला सुमित नागल याने पहिला सेट जिंकत सर्वांना धक्का दिला होता. मात्र त्यानंतर फेडररने आपला अनुभव लावत या सामन्यात विजय मिळवला. फेडररनं 4-6, 6-1, 6-2, 6-4 अशा प्रकारे या सामन्यात विजय मिळवला. मात्र सुमितने त्याला कडवी झुंज दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फेडररने सुमितचे त्याच्या खेळीबद्दल कौतुक देखील केले होते.

Loading...
You might also like