US ची ‘फायजर’ अन् ‘मॉडर्ना’ लस प्रभावी ! कोरोनाचा धोका 90 % कमी, संशोधनाचा निष्कर्ष

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना या लसीसंदर्भात चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकेत केलेल्या संसोधन अहवालानुसार या दोन्ही लसीचा पहिला डोस चांगलाच परिणामकारक ठरला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना संक्रमण होण्याची शक्यता 90 टक्के कमी असते.

अमेरिकेतील 4000 नागरिकांवर या लसीच्या वापरावरुन संशोधन झाले आहे. आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्करचाही लसीकरण केलेल्या या 4 हजार रुग्णांमध्ये समावेश आहे. 14 डिसेंबर 2020 ते 13 मार्च 2021 या कालावधीत हे संशोधन झाले असून सोमवारी त्याचा निष्कर्ष अहवाल प्रसिध्द केला आहे. कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी ही लस किती प्रभावशाली आहे, हा निष्कर्ष या संशोधनाच्या माध्यमातून केला आहे. यूस एस सेंटरर्स फॉर डीजीस कंट्रोल अँड प्रिवेशनने हे संशोधन केले आहे. सीडीसीचे संचालक रोशल वेलेंस्की यांनी म्हटले की, लसीकरणाचा आपला प्रयत्न यशस्वी होत असल्याचे या संशोधनातून दिसून येत आहे. या संशोधनासाठी दोन्ही कंपन्यांनी क्लिनीकल ट्रायल्सच्या डेटाचाही उपयोग केला आहे.