डोनाल्ड ट्रम्प ‘निर्दोष’ ! ‘महाभियोग’ खटल्यातून सुटणारे तिसरे ‘राष्ट्रध्यक्ष’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अधिकारांचा गैरवापर व संसदेच्या कामात अडथळे निर्माण केल्याच्या आरोपावरून अमिरेकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदच्युत करण्यासाठी महाभियोगाची कारवाई 21 जानेवारीपासून सिनेटमध्ये सुरु झाली होती. महाभियोगास सामोरे जावे लागणारे ट्रम्प हे तिसरे राष्ट्रध्यक्ष असून त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत असल्याने महाभियोगात दोषी ठरवून त्यांच्यावर हाकालपट्टीची नामुष्की येण्याची शक्यता कमी होती. त्यानंतर त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिनेटने फेटाळून लावल त्यांची निर्दोष मुक्तता केली. रिपब्लिकन पक्षाने 52-48 च्या फरकाने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून ट्रम्प यांना 53-47 मतांनी ट्रम्प यांना निर्देष ठरवण्यात आले. राष्ट्रध्यक्षांवर महाभियोगाची कारवाई होण्याची ही तिसरी वेळ असून यापूर्वी एंड्रय् जॉनसन आणि बिल क्लिंटन यांच्या महाभियोगाची कारवाई करण्यात आली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेनन्टेटिव्हज कडून आला होता. त्या सभागृहात विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. या सभागृहात ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचे दोन आरोप निश्चित करण्यात आले होते. महाभियोगाचा खटला झालेले डोनाल्ड ट्रम्प हे तिसरे राष्ट्रध्यक्ष होते. यापूर्वी महाभियोगाचा खटला दोन राष्ट्रध्यक्षांवर करण्यात आला होता. त्यांचीही या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. ट्रम्प हे महाभियोग खटल्यातून सुखरुप सुटणारे तिसरे राष्ट्रध्यक्ष आहे.
काय होते आरोप ?

अधिकारांचा व्यक्तिगत व पक्षीय स्वार्थासाठी गैरवापर केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर होता. अमेरिकी सरकारने युक्रेनला 391 दशलक्ष डॉलरची मदत मंजूर केली होती. परंतु ट्रम्प यांनी जो बिडेन व त्यांच्या मुलाच्या युक्रेनमध्ये व्यावसायिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर या काळात युक्रेन सरकारवर दबाव आणून मदतीची रक्कम प्रत्यक्ष अदा करणे रोखले.

संसदेच्या कामकाजात अडथळे, ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या तयारीसाठी हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजने चौकशी सुरु केली. या सभागृहाने ट्रम्प प्रशासनाकडून काही कागदपत्रांची मागणी करून काही अधिकाऱ्यांना साक्षीसाठी समन्स काढले. मात्र ट्रम्प यांनी ही कागदपत्रे व साक्षीदार रोखून धरले.