US President Agra visit : पत्नी मेलानियासह ताजमहलचं ‘सौंदर्य’ पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी रचला ‘इतिहास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत दौऱ्यावर असणारे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटूंब ताजमहल पाहण्यासाठी सोमवारी संध्याकाळी आग्राला पोहोचले. यावेळी ट्रम्प, पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनर उपस्थित होते. आग्राच्या खेरिया विमानतळावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रम्प कुटूंबाचे स्वागत केले.

यावेळी अनेक कलाकारांनी मयूर नृत्य प्रस्तुत केला. यानंतर प्रेमाचे प्रतिक समजला जाणारा ताजमहाल पाहून ट्रम्प मंत्रमुग्ध झाले. यावेळी व्हिजिटर बुकमध्ये त्यांनी ‘थॅंक यू इंडिया’ असे लिहिले. ताजमहाल पाहून पुन्हा खेरिया विमानतळावर आलेल्या ट्रम्प आणि पत्नी मेलानिया यांना मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी ताजमहालचे एक मोठे चित्र भेट दिले. त्यानंतर सहकुटूंब ट्रम्प विमानाने दिल्लीला रवाना झाले.

यावेळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांच्यासह फोटो देखील काढले. ताजमहाल परिसरात त्यांचा मोठा आदर सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पत्नी मेलानिया याचा हात हातात घेऊन मुख्य घुमटाकडे गेले. संध्याकाळी ताजमहालचे रुप अनोखे दिसते. संध्याकाळच्या केसरी रंगात उजळणारा ताज त्यांनी सतत वळून वळून पाहिला. या दरम्यान ते 17 हेक्टेयर गार्डनमध्ये देखील गेले.

यावेळी गाइड नितीन सिंह यांनी त्यांना जगातील सातव्या आश्चर्य असलेल्या ताजमहालचा इतिहास सांगितला. ट्रम्प यांनी मुलगी इवांका आपल्या कॅमेरातून ताजमहालचे फोटो काढण्यात दंग असल्याचे दिसले. ताजमहालचं मोहक रुप पाहिल्यावर ट्रम्प यांनी व्हिजिटर बुकमध्ये भारताच्या संस्कृती आणि कलेचे कौतूक केले. ते म्हणाले ताजमहाल अत्यंत अद्भूत आहे. यासाठी त्यांनी भारताचे आभार मानले.