जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या शाही डिनरमध्ये पोहचले ‘माकड’, AR रहमाननं शेयर केला Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा आटोपला आहे. ट्रम्प अमेरिकेसाठी रवाना सुध्दा झाले आहेत. परंतु, त्यांच्या या ऐतिहासिक दौर्‍यातील अनेक क्षण अजूनही चर्चेत आहेत. ट्रम्प यांनी बॉलीवुड चित्रपटांचा केलेला उल्लेख, इव्हांका ट्रम्पने घातलेले भारतीय कपडे, अशा अनेक चर्चा अजूनही रंगत आहेत. आता एक आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनरमध्ये माकड ?
मंगळवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, या शाहीभोजनाशिवाय एक माकडसुद्धा प्रसिद्धीत आले आहे. होय, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनरमध्ये एक माकड आढळून आले.

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. व्हिडिओत एक माकड कुंडीतील फूले आणि पाने खात आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ए. आर. रहमानने हा व्हिडिओ शेयर करताना लिहिले आहे की, आमचा मित्रसुद्धा जेवण करत आहे.

या क्यूट व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लोकांना तो आवडत आहे. ए. आर. रहमान यांनी या डिनरची अन्य छायाचित्रेही शेयर केली आहेत.

अनेक दिग्गजांना निमंत्रण
या कार्यक्रमात ए. आर. रहमानसह उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, मुख्य संरक्षण अध्यक्ष बिपिन रावत, विप्रोचे अजीम प्रेमजी आणि बँकर कोटक महिंद्रा सुद्धा उपस्थित होते.

You might also like