जस-जसा कोरोना वाढेल, चीनवरील माझा राग वाढतच जाणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारी आल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत चीनवर निशाणा साधत आहेत. हा विषाणू जगभर पसरवण्यासाठी चीनवर दोषारोप करत आहेत. आता त्यांनी आणखी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. ट्रम्प म्हणाले की कोरोना जसजसा वाढत जाईल, तसतसा माझा चीनवरील राग वाढत जाईल. कारण अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की अद्याप महामारी नियंत्रणात नाही.

ट्रम्प यांनी ट्विट केले, “जसे मला दिसते की महामारीने जगभरात आपला कुरूप चेहरा दाखवला आहे. त्यात अमेरिकेला झालेले मोठे नुकसान देखील समाविष्ट आहे. चीनवरील माझा राग वाढत आहे. मला ते जाणवत आहे आणि लोकांनाही ते दिसेल.”

ट्रम्प यांच्या मेडिकल एडव्हायजरने म्हटले- अमेरिकेत दररोज १ लाखपेक्षा जास्त प्रकरणे समोर येऊ शकतात डोनाल्ड ट्रम्पचे वैद्यकीय सल्लागार डॉ अँथनी फौची यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे यासारखी खबरदारी घेतली नाही, तर अमेरिकेत दररोज एक लाख नवीन प्रकरणे समोर येऊ शकतात.

संपूर्ण जगभरात कोरोनाने एक कोटी ५ लाख लोक संक्रमित
जगभरात कोरोना महामारी भयानक रूप धारण करत आहे. जगात एक कोटीहून अधिक लोक या आजाराने संक्रमित आहेत. वर्ल्डमीटरच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जगभरात एक कोटी ५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर मृतांचा आकडा पाच लाखांवर गेला आहे. मात्र सुमारे ५८ लाख लोक बरेही झाले आहेत. जगातील कोरोनाची ७० टक्के प्रकरणे केवळ १२ देशांतून आली आहेत. या देशांमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या ७३ लाखाहून अधिक आहे.