36 तास भारतात थांबणार डोनाल्ड ट्रम्प, PM मोदींसह करणार ‘लंच’ आणि ‘या’ मुद्यांवर होणार ‘चर्चा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी आपल्या पहिल्या भारत भेटीवर दाखल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प हे या दौऱ्यादरम्यान 36 तास भारतात राहू शकतात. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, ट्रम्प मोठ्या प्रतिनिधीमंडळासह भारतात येतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे कॅबिनेटचे अनेक मंत्रीही या भेटीचा भाग असणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प 24 फेब्रुवारीला अहमदाबाद येथे पोहोचतील. येथे रोड शोनंतर मोटेरा स्टेडियमवर पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प दोघेही येथे आयोजित कार्यक्रमास संबोधित करतील. ते म्हणाले, येथे आयोजित केलेला कार्यक्रम हाउडी मोदींच्या धर्तीवर असेल.

या मुद्द्यांवर केली जाणार चर्चा :
राष्ट्रपती ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संभाषणाचे मुख्य मुद्दे संरक्षण, दहशतवाद, ऊर्जा, प्रादेशिक बाबी राहतील. पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासाठी दुपारच्या जेवण आयोजन देखील करतील.

8 महिन्यात दोन्ही नेत्यांमध्ये 5 वी बैठक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात मागील 8 महिन्यांतील ही 5 वी बैठक आहे. स्वत: ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते पंतप्रधान मोदी यांना आपला सर्वात चांगला मित्र मानतात. दरम्यान, आपण आत्ताच भारताशी व्यापार करारावर स्वाक्षरी करणार नाही, असे सांगून त्याने भारताच्या अपेक्षांना धक्का दिला आहे. यापूर्वी दोन्ही देशांदरम्यान लवकरच करार होईल अशी भारताकडून अपेक्षा होती. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, अद्याप भारताचा जोर अद्याप व्यापार करारावर नाही. पण तिथे जे काही करार होतील, ते दोन्ही देशांसाठी ‘विन विन सिचुएशन’ सारखे असेल.