अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी ‘घोषणा’, म्हणाले – ‘मोदींना ‘मानतो’ पण भारत दौऱ्यात मोठं ‘डील’ नाही’

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे येत्या२४ फेबु्रवारीला भारताला भेट देण्यास येत असतानाच त्यांनी भारताला धक्का देणारे एक वक्तव्य केले आहे. भारतातील या दौऱ्यात कोणताही मोठा करार केला जाणार नाही. ट्रंप यांचे हे वक्तव्य समोर आले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या सुरक्षा संबंधित समितीची बैठक आज होणार आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सांगितले की, आम्ही भारताबरोबर एक व्यापारी करार करु शकतो. पण भारत दौऱ्यात कोणताही मोठा करार होणार नाही. मी मोदी यांना पसंद करतो, परंतु, भारतकडून आमच्याबरोबर चांगला व्यवहार केला जात नाही. डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौऱ्याअगोदर अनेक समझोत्यांवर सहमती होणार आहे. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या सुरक्षा संबंधित समितीच्या बैठकीत ६ नवे अपाचे हेलिकॉप्टर आणि २४ एमएच ६० हेलिकॉपटर खरेदीबाबतच्या समझोत्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागतासाठी करोडो रुपये खर्च करण्यात येत असल्याबद्दल अगोदरच विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टिका केली जात आहे. त्यात या घोषणेमुळे त्यात भर पडण्याची शक्यता आहे.