अमेरिेकेत JEO BIDEN ‘पर्व’सुरु ! DONALD TRUMP यांचे ‘हे’ आदेश फिरविण्याचा घेतला पहिला निर्णय

वॉशिंग्टन : कोरोनाची साथ, कॅपिटॉल हिल येथे झालेली हिंसा याच्या पार्श्वभूमीवर जगाची महासत्ता म्हणून गणल्या जाणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ ७८ वर्षाचे जो बायडेन यांनी घेतली. भारतीय अमेरिकन वंशाच्या कमला हॅरिस (वय ५६) यांनी उपाध्यपदाची शपथ घेतली आणि अमेरिकेच्या राजकारणात बायडेन -कमला पर्व सुरु झाले. शपथविधीनंतर डोनाल्ड टॅम्प यांचे वादग्रस्त ठरलेले निर्णय फिरविण्याच्या दोन आदेशावर पहिली स्वाक्षरी केली.

हवामान बदलावरील पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय डोनाल्ड टॅम्प यांनी घेतला होता. त्यावर जगभरातून टिका झाली होती. बायडेन यांनी पॅरिस करारात पुन्हा सामील होण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यातून जगभरातील हवामान बदलाबाबत होत असलेल्या अभ्यास व उपाय योजनांची अंमलबजावणी आता अमेरिकेवरही बंधनकारक राहणार आहे.

 

 

 

 

 

टॅम्प यांच्या कार्यालयात पहिल्या आठवड्यात २०१७ मध्ये अंमलात आणलेल्या मुस्लिम बंदीने सात मुस्लिम बहुल राष्ट्रांमधील नागरिकांचा प्रवास प्रतिबंधित केला होता. इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशातील नागरिकांना अमेरिकेत बंदी घालण्यात आली होती. या बंदीला अनेक कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला होता. या सात देशांसह अनेक मुस्लिम व आफ्रिकन देशांमधील अमेरिकेचा प्रवास रोखला गेला होता.

बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधील कार्यालयात गेल्यानंतर ही बंदी संपुष्टात आणण्यासह १७ कार्यकारी आदेश व स्मारकांवरील बंदी उठविण्याची घोषणा केली. बाधित देशांमधील व्यक्तींसाठी व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.