अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांचं चीनबद्दल मोठं विधान, म्हणाले – ‘ड्रॅगनच्या आव्हानांचा थेट सामना करणार US’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था  –   अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चीन सरकारबाबत मोठं वक्तव्य केले आहे. याबाबत बायडन म्हणाले, की देशाचे हित जर साधायचे असेल तर गरज पडल्यास आम्ही बीजिंगसोबत हात मिळवून काम करण्यास घाबरणार नाही.

ज्यो बायडन यांनी जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर ते आता परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना ‘फॉगी बॉटम’ मुख्यालय येथे संबोधित करत होते. तेव्हा ते म्हणाले, आम्ही चीनकडून सुरु करण्यात आलेल्या आर्थिक शोषणाविरोधात लढा देणार आहोत. मानवाधिकार, बौद्धिक संपदा आणि वैश्विक शासनावर चीनकडून होणारे हल्ले कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाईल.

…तर चीनला चोख प्रत्युत्तर

अमेरिकेच्या हितासाठी आम्ही बीजिंगसोबत हात मिळवणी करून काम करू शकतो. पण जर चीनने त्यामध्ये खोडा घालत कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास तर आम्ही चीनच्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ, हेदेखील बायडन यांनी सांगितले.

चीनच्या नीतीवर भाष्य

चीनच्या विषयावर बायडन यांच्या सरकारची नीती कशी असेल याबाबत बोलताना ते म्हणाले, जेव्हा अमेरिकेच्या फायद्यासाठी बीजिंगशी हात मिळवणी करून काम करू. आम्ही आमचे सहयोगी आणि भांडवलदारांसोबत काम करणार आहोत. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांना नवे स्वरुप देऊन देशातील विश्वसनीयता आणि नैतिक अधिकाराला पुन्हा प्राप्त करण्यासाठी देशातील परिस्थिती चांगली बनविण्यासाठी काम करू.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेच्या भागीदाराचे प्रयत्न

आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची भागीदारी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही जो बायडन यांनी सांगितले.