अमेरिकेने काश्मीर संदर्भात दिली अशी प्रतिक्रिया, पाकिस्तान झाले नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि लडाख आणि जम्मू-काश्मीर या दोन केंद्र शासित प्रदेशात त्याची विभागणी केली गेली. या निर्णयाला एक धाडसी पाऊल म्हणून पाहिले गेले. मात्र,अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानने यासाठी अनेक देशांची मदत घेतली , मात्र त्याच्या पदरात काहीच पडले नाही. याबाबत पाकिस्तानला अमेरिकेकडून आशा होती. परंतु तत्कालीन ट्रम्प प्रशासनाने या प्रकरणाबद्दल काहीही सांगितले नाही. त्यानंतर आता बायडन सरकारच्या प्रतिक्रियेकडे पाकिस्तान आस लावून बसले होत कि, बायडन राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना काश्मीर प्रकरणात पाठिंबा मिळेल, पण येथेही पाकिस्तानच्या हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी नियमित पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीरला भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हटले. असे म्हटले जाते की, अमेरिकेच्या वतीने जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणणे हे मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने लिहिले की, अमेरिकेने आश्वासन दिले की काश्मीरबाबतच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही, परंतु काश्मीरसाठी केंद्रशासित प्रदेशाचा शब्द आपल्या निवेदनामध्ये वापरला गेला.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइसने पत्रकार परिषदेत काश्मीरविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, “आम्ही जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर बारीक नजर ठेवू. भारतीय लोकशाहीच्या अनुषंगाने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधील राजकीय आणि आर्थिक परिस्थिती सामान्य करण्यासाठी घेतलेल्या चरणांचे आम्ही स्वागत करतो.” एवढेच मागच्या महिन्यात काश्मीरमध्ये हाय-स्पीड इंटरनेट पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना अमेरिकेने जारी केलेल्या निवेदनामुळे पाकिस्तानला मिरची झोंबल्या होत्या. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या ट्विटमध्ये जम्मू-काश्मीरचा विवादित क्षेत्र म्हणून नाही तर ‘भारताचे जम्मू-काश्मीर’ म्ह्णून उल्लेख होता. या ट्विटवर पाकिस्तानकडून कडाडून विरोध झाला, पाकिस्तान-व्याप्त काश्मीरचे कथित राष्ट्रपती मसूद खान यांनीही यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, नेड प्राइस यांना माहित असले पाहिजे की, जम्मू-काश्मीरचा कोणताही भाग भारताच्या जम्मू – काश्मीरचा नाही आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा व्यापलेला केंद्रशासित प्रदेश नाही. परंतु असे असूनही ट्विटमध्ये कोणतेही बदल करण्यात आला नाही.

नेड प्राइसने प्राइस ने पत्रकार परिषदेत असेही म्हटले की, भारत आणि पाकिस्तान या दोघांचे संबंध अमेरिकेसाठी महत्वाचे आहेत आणि कोणत्याही एका किंमतीवर संबंध राखले जाणार नाहीत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, अमेरिकेला भारताशी संबंध मजबूत करण्याची इच्छा आहे पण पाकिस्तानबरोबरचे संबंधही महत्त्वाचे आहेत. नेड प्राइस म्हणाले की, बायडन प्रशासनाशी भारताशी चांगले संबंध असणे म्हणजे पाकिस्तानशी संबंध बिघडतील असे नाही. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण एकाच्या फायद्यावर आणि दुसर्‍याच्या तोट्यावर आधारित नाही.