भारतावरील हल्ल्यामुळं अमेरिकेनं पाकिस्तानला घेतलं फैलावर

पोलीसनामा ऑनलाईन : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केले, ज्यात अनेक दहशतवादी स्थळ उध्वस्त करण्यात आली. या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारताविरोधात F-१६ या फायटर विमानांचा वापर केला. या प्रकरणी आता अमेरिकेने पाकिस्तानला फैलावर घेतल्याचे समोर आले आहे. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, F-१६ फायटर विमानांचा गैरवापर केल्याबद्दल अमेरिकेन पाकिस्तानच्या हवाई दल प्रमुखांना धारेवर धरले आहे.

ऑगस्ट महिन्यात तत्कालिन शस्त्र नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाच्या उपमंत्री अँड्रीया थॉम्पसन यांच्याकडून पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख मार्शल मुजाहिद अन्वर खान यांना पत्र पाठवण्यात आले होते. ज्यातून त्यांनी अमेरिकेने एफ-१६ विमानाच्या वापराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ज्यात थॉम्पसन यांनी स्प्ष्ट केले होते कि , “राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टासाठी तुम्ही F-१६ विमानाचा वापर केल्याचे आम्हाला तुमच्याकडून समजले. पण अमेरिकन सरकारशी संबंधित नसलेल्या तळांवर या विमानांना हलवणं ही आमच्यासाठी चिंतेची बाब असून हे F-१६ विमानांसंबंधी झालेल्या कराराशी सुसंगत नाही”

नेमकं काय घडलं होतं ?
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने दहशतवादी हल्ल्या घडवून आणला. ज्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत २६ फेब्रुवारीला बालाकोटमधील जैशच्या तळावर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांची ठिकाण उध्वस्त केली. भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानने २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारताच्या हवाई हद्दीत घुसली होती. यावेळी भारताने पाकिस्तानचे एक F-१६ विमान पाडले आणि त्यांचाच डाव यांच्यावरच उधळून लावला.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/