बूस्टर रॉकेट आकाशातच बंद पडल्याने दोन अंतराळवीरांची इमर्जन्सी लँडिंग

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिका आणि रशियाच्या दोन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात घेऊन जाणारे बूस्टर रॉकेट आकाशातच बंद पडल्याने दोन्ही अंतराळवीरांनी इमर्जन्सी लँडिंग केले. या घटनेत दोन्ही अंतराळवीर थोडक्यात बचावले. इंजिन फेल झाले त्यावेळी रॉकेटचा स्पीड ८ हजार किमी प्रतितास होता. दोन्ही अंतराळवीरांनी कझाकिस्तानच्या एका मैदानात लँडिंग केले. नंतर लगेचच दोघांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विमानतळ आणि नंतर रुग्णालयात नेण्यात आले. दोघेही सुखरूप असल्याची माहिती नासाने दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf9d0665-cdd4-11e8-87d1-9f3937acccca’]

अमेरिकेचे निक हग आणि रशियाचे अ‍ॅलेक्झी ओवचीनीन हे अंतराळवीर सोयुज एम. एस. १० या अंतराळ यानाला बूस्टर रॉकेट आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात घेऊन जात होते. प्रक्षेपण झाल्यानंतर सोयूज अंतराळ यानाने काही अंतर योग्यपणे कापले, पण जास्त उंचीवर गेल्यानंतर त्याचे इंजिन फेल झाले आणि ते ते मध्य आकाशातच बंद पडले.

‘तितली’मुळे आंध्रात ८ ठार, ओडिशात अतिवृष्टी

इंजिन फेल झाल्यानंतर अंतराळवीरांचे कॅप्सूल आपोआप रॉकेटपासून वेगळे झाले आणि ते सुखरूपरित्या जमिनीवर परतले. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये आपोआप रॉकेटपासून वेगळे होणारे कॅप्सूल १९६० च्या दशकात बनवण्यात आले होते. दोन्ही अंतराळवीर सुखरूप असून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असं नासाने सांगितले.

[amazon_link asins=’B00KDQZQDW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f055b63d-cdd4-11e8-89bb-437b1a6cc7b1′]