भारतासोबत उभी आहे अमेरिका, गलवान खोर्‍याचा उल्लेख करून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी सांगितलं

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या तिसर्‍या ’2+2’ मंत्री स्तरीय बैठकीत सोमवारी बीईसीए करारावर (बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट) हस्ताक्षर केले. या करारानंतर भारत-अमेरिकेदरम्यान माहितीचे सहज अदान-प्रदान करता येईल. बैठकीनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ, सरंक्षण मंत्री मार्क एस्पर आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राजनाथ सिंह यांनी संयुक्त वक्तव्य जारी केले. राजनाथ सिंह यांनी म्हटले की, बैठकीत दोन्ही देशांनी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे आणि बीईसीए करार एक महत्वपूर्ण पाऊल आहे. तर, माइक पोम्पिओ यांनी जून महिन्यात झालेल्या गलवान खोर्‍यातील हिंसेचा सुद्धा उल्लेख केला.

संरक्षण मंत्री राजनात सिंह यांनी म्हटले की, अमेरिकेच्या सोबत सैन्य स्तरावरील आमचे सहकार्य खुप चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे, संरक्षण उपकरणांच्या संयुक्त विकासासाठी योजनांवर चर्चा झाली आहे. आम्ही इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांती आणि सुरक्षेसाठी पुन्हा आमची प्रतिबद्धता व्यक्त करतो.

संयुक्त वक्तव्याच्या दरम्यान, अमेरिकेने चीनवर निशाणा साधला. गलवानचा उल्लेख करत माईक पोम्पिओ यांनी म्हटले की, आम्ही नॅशनल वॉर मेमोरियलचा दौरा केला, जेथे भारतीय सशस्त्र दलाच्या बहादुर जवानांना श्रद्धांजली दिली गेली. यामध्ये गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या 20 जवानांचाही समावेश होता. ते पुढे म्हणाले, अमेरिका भारताच्या सोबत उभी आहे, कारण दोन्ही सार्वभौमत्व, लिबर्टीच्या धोक्याचा सामना करत आहेत. माईक पोम्पिओ यांनी चीनवर हल्ला करत म्हटले की, आमचे नेते आणि जनता स्पष्टपणे पहात आहे की, चीनची कम्युनिष्ट पार्टी लोकशाही, कायदा आणि पारदर्शकतेला मानत नाही.

धोक्याला तोंड देण्यासाठी भारतासोबत : पोम्पिओ
पोम्पिओ यांनी म्हटले, आम्ही संपूर्ण सुरक्षा धोक्यांना तोंड दण्यासाठी संबंधांना मजबूती प्रदान करत आहोत, केवळ चीनी कम्युनिस्ट पार्टीला आव्हान देण्यासाठी हे नाही. आम्ही भारताच्या सार्वभौमत्वावरील धोक्याला तोंड देण्यासाठी त्याच्या सोबत उभे आहोत. अमेरिका आणि भारतामध्ये आमच्या लोकशाही आणि मुल्यांच्या रक्षणासाठी चांगला ताळमेळ आहे. तर, अमेरिकन संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी सुद्धा संयुक्त वक्तव्यात म्हटले की, चीनद्वारे वाढती आक्रमकता आणि अस्थिर करणार्‍या हालचाली पहाता अमेरिका भारतासोबत उभी आहे. आपल्या एक मुल्य आणि हिताच्या आधारावर आम्ही स्वातंत्र्य आणि ओपन इंडो-पॅसिफिकच्या समर्थनात खांद्याला खांदा लावून उभे आहोत. एस्पर यांनी पुढे म्हटले की, जग एक जागतिक महामारी आणि वाढती सुरक्षा आव्हानांचा सामना करत आहे, भारत-अमेरिकेचे सहकार्य क्षेत्र आणि जगाची सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धी ठरवण्यासाठी अगोदरपेक्षा कितीतरी जास्त महत्वपूर्ण आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काय म्हटले?
टू प्लस टू चर्चेनंतर संयुक्त वक्तव्य जारी करत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटले की, आपला राष्ट्रीय सुरक्षा ताळमेळ वाढला आहे. इन्डो-पॅसिफिक आमच्या चर्चेचे केंद्र राहिले आहे. बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान शेजारी देशांबाबत सुद्धा उल्लेख केला गेला. आम्ही स्पष्ट केले की, सीमेवर दहशतवाद पूर्णपणे अस्वीकार्य आहे.