भारतासाठी मोठा धक्का ! अमेरिकेने ‘कोरोना’ग्रस्तांवरील ‘ही’ उपचार पद्धती थांबवली

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनावर सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नसले तरी प्लाझ्मा थेरपी कोरोना बाधित रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा थेरेपीचं ट्रायल केलं जात आहे. देशात दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात प्लाझ्मा थेरपी वापरली जात आहे. मात्र, आता प्लाझ्मा थेरेपीचा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर करणे अमेरिकेने थांबवलं आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कोरोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीला मंजूरी दिली होती. मात्र, आता कोरोना बाधित रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपी बंद करण्यात आली आहे. अमेरिकेतील आकडेवारीनुसार प्लाझ्मा थेरेपीची कोरोना रुग्णांवर फारसा परिणाम दिसून येत नाही आहे. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी फायदेशीर ठरु शकते अशा निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी सध्या उपलब्ध असलेला अहवाल पुरेसा नसल्याचं वरिष्ठ आरोग्य अधिकांऱ्यांनी सांगितले. दरम्यान, भारतात प्लाझ्मा थेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे आणि वापर केला जात आहे. दिल्ली, महाराष्ट्र, हरयाणा अशा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी वारली जात आहे.

भारतात प्लाझ्मा थेरपीचा वापर सुरु केल्यानंतर प्लाझ्मा बँकही उभारण्यात आल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीची सुरक्षितता आणि परिणामकता तपासण्यासाठी एप्रिलमध्ये ट्रयल सुरु केलं. मात्र त्याचा अहवाल अद्याप जारी करण्यात आलेला नाही. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल इथिक्सचे अमर जेसानी म्हणाले, प्लाझ्मा थेरेपी प्रभावी आहे. क्लिनिकल ट्रायलच्या अहवालातूनच समजू शकतं. भारतात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरेपीचं क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यात आलं. आता ऑगस्ट महिना सुरु आहे. मात्र अद्याप अहवाल आलेला नाही.