तब्बल 100 गाड्यांचा एकमेकांवर आदळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी; जाणून घ्या कसा झाला ‘हा’ अपघात

टेक्सास : वृत्तसंस्था –  अमेरिकेतील टेक्सासमधील फोर्ट वर्थ या भागातून जाणाऱ्या आय-35 महामार्गावर तब्बल १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत. अशी ही धक्कादायक घटना त्या महामार्गावर घडली आहे. ही घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली. त्या झालेल्या अपघातात ६ जण ठार झाले आहेत. तर ६५ जण जखमी अवस्थेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ गंभीर जखमींसह ३६ जणांना घटनास्थळावरून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर अनेकांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं तर अनेक जण घटनास्थळाहून स्वत: निघून गेले आणि नंतर रुग्णालयात भरती झाले. या अपघातातील सर्व जण प्रौढ होते, तसेच अंग गोठवणाऱ्या थंडीत पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर फोर्ट वर्थ हायवेवर निसरडा झाला असल्याने आणि धुक्याने पुढचे दिसत नसल्यामुळे या १०० कारची एकमेकांवर आदळून हा अपघात झाला असावा तर अनेक जण त्यात गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत असा फोर्ट वर्थ पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, अमेरिकेत गेल्या तीन दशकांमध्ये मोठे अपघात झाल्याचा इतिहास आहे. १९८८मध्ये केंचुकीतील काराल्टोनजवळ दारु प्यालेल्या ड्रायव्हरने गाडी धडकवल्याने २७ जणांचा मृत्यु झाला होता. त्यात २४ लहान मुलांचा समावेश होता. टेनेससीमधील कॅलहॉनमध्ये १९९० मध्ये ७५ गाड्या धुक्यामुळे एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात १२ जणांना मृत्यू झाला होता. तसेच, फोर्ट वर्थच्या महापौर बेट्सी प्राइस यांनी आय-35 महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच नागरिकांना भोगायला लागणारा त्रास पाहून माझ्या मानाला प्रचंड वेदना होता आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.