सावत्र आई मुलांसमोरच झाली ‘नग्न’, वडिलांना देखील ‘नेकेड’ होण्यास सांगितल्यानं ‘लफडं’ कोर्टात पोहचलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लैंगिक छळाचे असे एक प्रकरण समोर आले आहे की, कुणालाही विश्वास बसणं कठीणच. सदरील घटना ही अमेरिकेच्या यूटा मधील आहे. झालेला प्रकार असा की, एका आईवर लैंगिक छळाचा आरोप झाला आहे आणि त्या आरोपाचे कारण म्हणजे आईने मुलांसमोर नग्न होणे. अमेरिकेच्या कोर्टात एका महिलेवर लैंगिक छळ केल्याचा खटला चालू आहे कारण ती महिला तिच्या घरी टॉपलेस होती. आणि तिच्या सावत्र मुलाने त्याच्या आईला या अवस्थेत पाहिले.

काय आहे संपूर्ण प्रकरण
टिली ब्युकैनन नामक एका महिलेवर न्यायालयात तीन खटले चालू आहेत. कारण महिला आपल्या घरात आपल्या शरीराचा वरचा भाग न झाकताच नग्न अवस्थेत फिरत होती. आणि हा खटला चालू असल्याचे कारण म्हणजे यूएसमध्ये काही राज्य असे आहेत की, ज्यात आपल्या स्वतःच्या घरात देखील आपण ‘काही परिस्थितींमध्ये’ टॉपलेस राहू शकत नाही.

टिली वर जे आरोप लावले आहेत त्यांप्रमाणे जर तिला शिक्षा झाली तर टिली ३६४ दिवसांसाठी जेलमध्ये जाऊ शकते. तसेच २,५०० डॉलर इतका दंड देखील होऊ शकतो. टिली पुढील दहा वर्षांसाठी नोंदणीकृत लिंग उत्पीडन म्हणून नोंदणीकृत असेल. खरंतर, या प्रकरणात अमेरिकेत दोन विचारांचे गट निर्माण झाले आहेत, काही लोक जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्तीची मागणी करीत आहेत तर काहीजण ते योग्य सांगत आहेत.

या खटल्यात नोंद केली गेली आहे की, टिली नशेत होती आणि तिने नशेत आपल्या सावत्र मुलांच्या समोर आपले कपडे काढून टाकले. जेव्हा तिच्या पती ने तिला कपडे घालण्यास सांगितले तेव्हा टिलीने अशी अट घातली की जेव्हा तिचा नवरा सर्वांसमोर पूर्णपणे नग्न होईल तेव्हाच ती कपडे घालणार.

यावर टिलीने काय सांगितले ?
या प्रकरणात महिलेने वेगवेगळे युक्तिवाद केले आहेत. तिने म्हटले की, हा माझ्या स्वतःच्या घरातील प्रश्न आहे. माझा नवरा माझ्याबरोबर होता. त्यानेही आपले कपडे काढले होते आणि मीसुद्धा. पण खटला फक्त माझ्यावर चालविला जात आहे माझ्या पतीवर का नाही ?

महिलेने सांगितले की, Child and Family Services यांना समजले पाहिजे की मी एक स्त्रीवादी आहे आणि माझ्या सावत्र बालवयीन मुलांना स्तनांबद्दल त्यांच्या मनात असलेली विचारप्रक्रिया सामान्य बनविण्यासाठी माझा प्रयत्न होता. अशा परिस्थितीत माझ्यावर कोणताही खटला भरण्यात येऊ नये.

आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात टिलीने दिलेल्या या आव्हानावर कोणता निर्णय घेतला जातो. परंतु सोशल मीडिया आणि स्थानिक लोक यांच्यामार्फत ही बाब चर्चेत ठेवली जात आहे.

Visit : Policenama.com