काश्मीरमध्ये हिंसा करणारे पाकिस्तानी आतंकवादी काश्मीर आणि PAK चे ‘दुश्मन’, इम्रान खानच्या वक्तव्याचा अमेरिकेकडून ‘स्वागत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने इम्रान खान यांनी जिहादींना उद्देशून केलेल्या वक्तव्याचे स्वागत केले आहे तसेच हे वक्तव्य महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. क्षेत्रीय ठिकाणी स्थिरता येण्यासाठी अमेरिका पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची अपेक्षा करत आहे.

अमेरिकेचे विदेश मंत्री एलिस वेल्स यांनी हे वक्तव्य इम्रान खान यांच्या दौऱ्याआधी केले आहे. इम्रान खान न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रातील सभेला संबोधित करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्प यांची सुद्धा भेट इम्रान खान घेऊ शकतात.

इम्रान खान यांनी काश्मिरात धुडगूस घालणाऱ्या दहशतवाद्यांना ते पाकिस्तानचे दुश्मन आहेत असे वक्तव्य केले होते. इम्रान खान यांच्या या भूमिकेचे स्वागत करत वेल्स यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, पाकिस्तानला दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले.

इम्रान खान यांनी बुधवारी जिहादींना काश्मीरकडे न जाण्याचे आवाहन केले होते. एका पत्रकार परिषदेत बोलताना इम्रान खान असे म्हणाले होते की, जर पाकिस्तानकडून कोणी काश्मीरमध्ये गेले तर भारताला उगाच पाकिस्तानवर हल्ला करण्याची संधी मिळेल. भारताने या आधीही पाकिस्तानवर सीमे बाहेरून दहशतवाद पसरवण्याचे आरोप केलेले आहेत.

एका पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार खान यांनी जो पण काश्मिरात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तो पाकिस्तान आणि काश्मीरचा शत्रू असल्याचे म्हंटले आहे. तसेच खान यांनी आधीच सांगितले आहे की या मुद्द्यावरून ते 27 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या सभेत हा मुद्दा उचलणार आहेत. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे इम्रान खान म्हणाले की यावेळेस ते संयुक्त राष्ट्रासमोर आपली बाजू मोठ्या ताकदीनिशी मांडणार आहेत.

visit : Policenama.com