‘या’ महिलेनं घरातच पाळेले होते 140 साप, आता अजगराच्या ‘मिठी’त आढळला मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत एका महिलेचा मृतदेह सापडला असून तिच्या गळ्याभोवती 8 फुटाचा अजगर देखील वेटोळे घातलेला दिसून आला आहे. 36 वर्षीय हि महिला इंडियाना या भागातील आपल्या घरी मृत आढळून आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरी हि महिला मृताव्यवस्थेत आढळून आली असून तिने आपल्या घरी जवळपास 140 साप पाळले होते. मृतदेहाच्या गळ्याभोवती एका 8 फूट लांब अजगराने वेटोळा घातला होता. डॉक्टरांनी या महिलेचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यामध्ये अपयश आले. शेरिफ मुनसन आणि हर्स्ट या दोघीनीं जवळपास 140 साप आपल्या घरी पाळले होते. त्यानंतर हर्स्ट हिला जमिनीवर पडलेले पाहिल्यानंतर तिच्या शेजारणीने पोलिसांना याची सूचना दिली.

प्राथमिक अंदाजानुसार, अजगराने गळा घोटल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर नक्की मृत्यू कशामुळे झाला याचा खुलासा केला जाणार आहे. तिच्या गळ्याभोवती वेटोळा घातलेला अजगर हा तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचा असून तिचा मृत्यू धक्कादायक असल्याचे शेजारणीने म्हटले आहे.

दरम्यान, या जातीचे अजगर आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येत असून जगातील 30 सर्वात मोठ्या सापांमध्ये त्याचा समावेश होतो.

Visit : Policenama.com