अमेरिका : प्रेग्नंट महिलेचे पोट कापून बाळ घेऊन पळाली होती महिला, असा दिला जाईल मृत्यूदंड

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन  –   अमेरिकेत एका महिलेस हत्येच्या गुन्ह्यात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. अमेरिकेच्या पोलीस दलाने सांगितले की, मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या या महिलेने एका गरोदर महिलेची हत्या केली होती. आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही तर तिने गरोदर महिलेचे पोट कापून तिचे बाळ काढले आणि ते घेऊन ती फरार झाली. महिलेवरील आरोप सिद्ध झाले आहेत आणि आता तिला 8 डिसेंबरला विषाचे इंजेक्शन देऊन मृत्यूची शिक्षा दिला जाणार आहे. अमेरिकेत कोणत्याही महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा 67 वर्षानंतर मिळत आहे. अमेरिकेत सुमारे 20 वर्षांच्या प्रतिबंधानंतर 3 महिन्यांपूर्वीच मृत्यूची शिक्षा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मुलगी आता 16 वर्षांची झाली

मांटोगोमॅरीचे वय आता 52 वर्ष झाले आहे आणि तिला इंडियानाच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. येथेच तिला 8 डिसेंबरला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. मुलगी आता 16 वर्षांची झाली आहे आणि कोर्टाने तिला वडिलांकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे.

रश्शीने गळा आवळून केला खून

36 वर्षांच्या मांटोगॅमरी नावाची महिला 2004 मध्ये कुत्रा खरेदी करण्याच्या बहाण्याने 23 वर्षीय बॉबी स्टीनेटच्या घरी गेली. यानंतर मांटोगोमॅरीने 8 महिन्यांच्या गरोदर स्टीनेटचा गळा आवळला आणि तिचे पोट फाडून बाळ घेऊन ती फरार झाली. पोलिसांनी मांटोगोमॅरीला अटक केली.

अनेक न्यायालयांत केले अपील

पोलिसांनी मिसौरीच्या एका कोर्टात मांटोगोमॅरीला सादर केले, जेथे तिने आपला गुन्हा कबूल केला होता. हत्येच्या चार वर्षानंतर 2008 मध्ये तिला अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मांटोगोमॅरीने अनेक फेडरल कोर्टांचे दरवाजे ठोठावले, परंतु प्रत्येक ठिकाणी तिची शिक्षा काय ठेवण्यात आली.

अमेरिकेत 1953 मध्ये एकखाद्या महिलेल्या शेवटची मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. येथे मागील 67 वर्षात कोणत्याही महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली नाही. भारतात मृत्यूदंडाच्या शिक्षेत फाशी प्रचलित आहे.