एक्स लव्हरला विसरण्यासाठी यापेक्षा भारी काही नाही

पोलिसनामा ऑनलाईन – एका प्राणीसंग्रहालयाने प्रेमात अपयशी ठरलेल्या दिलजलेंसाठी एक वेगळी ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार लोक आपल्या जुन्या प्रेयसीला किंवा प्रियकरावर आपला राग व्यक्त करू शकतील आणि याने त्यांना ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर येण्याची संधी मिळेल. अमेरिकेतील टेक्सास प्रांतात सेन एंटोनियो (San Antonio) या नावाचं एक प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयाच्या गव्हर्नमेन्टने येणाऱ्या १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन- डे (Valentine’s Day) दिवशी पर्यटकांसाठी एक वेगळी अशी ऑफर काढली आहे. प्रियकर वा प्रेयसींना आपला राग व्यक्त करण्याची एक सुवर्णसंधी पुढे आणण्यात आली आहे.

प्रेमात धोका मिळाला किंवा नकार मिळाला तर प्रियकर वा प्रेयसींची परिस्थितीची कहाणी कशी असते काय त्रास होतो, हे लोक आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत दिवसरात्र अश्रू वाहत असतात. आठवणी म्हणून त्यांच्या वस्तू, त्यांचे फोटो सारखं सारखं बघत असतात. नकार किंवा दगा मिळाल्याने हे लोक चिडलेले असतात. मात्र ते राग व्यक्त करू शकत नाहीत. परंतु संताप व्यक्त करण्याची एक सुवर्णसंधी पुढे आली आहे. १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन- डे (Valentine’s Day) दिवशी ही एक मजेदार क्रियाकलाप आहे. ज्यात लोक झुरळ आणि उंदरांची नाव आपल्या एक्स प्रेमीच्या नावावर ठेवू शकतील. म्हणजे येथील झुरळ आणि उंदरांना तुमच्या एक्स प्रेमीचं नाव ठेवता येईल. नाव ठेवण्यापर्यंत तर ठीक आहे. मात्र तेच झुरळ आणि उंदीर एखाद्या प्राण्याला खाऊ घातले तर काय विचार कराल. हे असंच होणार आहे. ज्या झुरळ किंवा उंदराला तुमच्या एक्स प्रेमीचं नाव दिलं आहे. ते तुम्हाला एखाद्या प्राण्याला खाऊ घालण्याची संधी दिली जाणार आहे.

सेन एंटोनियो या प्राणी संग्रहालयाचा एक विचार आहे की, एका जीवाला नाव देऊन ते दुसऱ्या प्राण्याला खाऊ घातल्याने त्या लोकांना आनंद मिळले जे प्रेमात मिळालेल्या धोक्याने खचलेले आहेत किंवा नकारल्यामुळे बिथरलेले आहेत. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला हा त्रास होतोय त्याचं नाव एका जीवाला दिलं आणि तो जीव दुसऱ्या प्राण्याला खाऊ घातला तर व्यक्तीच्या मनाला शांतता मिळेल. असा काही विचार करण्यात आला आहे. याबाबत जास्त करण्याआधी हे जाणून घ्या की, हा एक निधी संकलन कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे. ‘क्राय मी ए कॉकरोच'(Cry me a cockroach) यातून मिळणारे पैसे सामाजिक कामासाठी खर्च केले जातील. एका झुरळाचं नामकरण करण्यासाठी लोकांना ५ डॉलर द्यावे लागतील. आणि ते झुरळ दुसऱ्या प्राण्याला खाऊ घालण्यासाठी तुम्हाला २५ डॉलर द्यावे लागतील. म्हणजे नवीन प्रेम शोधण्याआधी आपल्या मनातील दु:खं दूर करायचं असेल तर ही कल्पना मजेदार ठरू शकते. तुम्ही झुरळाऐवजी एखाद्या उंदराचं किंवा भाजीचंही नामकरण करू शकता. असे या प्राणीसंग्रहालयाने प्रेमात अपयशी ठरलेल्या दिलजलेंसाठी एक वेगळी अशी आश्चर्यचकित आयडिया आणली आहे.